‘बाहुबली’ या सिनेमानंतर जगभरातील चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनलेला साऊथ सुपरस्टार प्रभास ( prabhas )याच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. होय, तुमचा आमचा आवडता प्रभास आता हॉलिवूडसाठी सज्ज झाला आहे. अगदी ‘मिशन इम्पॉसिबल’ त्याचे पॉसिबल करून दाखवलेय, असे म्हणायलाही हरकत नाही. होय, प्रभास लवकरच हॉलिवूड सुपरस्टार टॉम क्रूजच्या (Tom Cruise starrer Mission Impossible 7 ) लोकप्रिय फ्रेंचाइजीचा अॅक्शन सिनेमा ‘मिशन इम्पॉसिबल 7’मध्ये दिसणार आहे. सध्या या सिनेमाबद्दलची एक पोस्ट व्हायरल होतेय. ही पोस्ट वाचून प्रभासच्या चाहत्यांचा आनंद गगणात मावेनासा झाला आहे. प्रभास लवकरच ‘मिशन इम्पॉसिबल 7’ मध्ये झळकणार असल्याचा दावा या पोस्टमध्ये करण्यात आलाय.
चर्चा खरी मानाल तर ‘मिशन इम्पॉसिबल’च्या दोन पार्टचे दिग्दर्शन केलेले दिग्गज दिग्दर्शक क्रिस्टोफर मॅकक्वेरी यांनी या फ्रेंचाइजीच्या 7 व्या पार्टसाठी प्रभासशी संपर्क साधला आहे. मॅकक्वेरी यांनी प्रभासला या सिनेमात एक महत्त्वाची भूमिका देऊ केली आहे.क्रिस्टोफर मॅकक्वेरी आणि प्रभास यांच्यात चर्चा झाली़ प्रभास ‘राधे-श्याम’ सिनेमासाठी इटलीत असताना ही भेट झाल्याचे कळतेय. अर्थात अद्याप या वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
आता प्रभासची कंपनी यूव्ही क्रिएशन्स ‘राधे-श्याम’ हा चित्रपट घेऊन येत आहे. या चित्रपटात प्रभास आणि पूजा हेगडे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे चित्रीकरण युरोपमध्ये झाले असून 30 जुलै रोजी चित्रपट रिलीज होणार आहे. साहजिकच या चित्रपटाकडून मोठ्या आशा आहेत. राधा कृष्ण कुमार यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात प्रभास लव्हर बॉयची भूमिका साकारत आहे.
‘राधे-श्याम’ व्यतिरिक्त आदिपुरुषमध्येही प्रभास दिसणार आहे. यामध्ये भगवान श्रीराम यांची भूमिका प्रभास साकारणार आहे. अजय देवगण यामध्ये भगवान शंकराच्या भूमिकेत दिसून येणार आहे. सालार आणि नाग अश्विनच्या मल्टीस्टारर ‘साय-फाय’या चित्रपटातही प्रभास दिसणार आहे. प्रभासने तेलुगु सिनेमातून सिनेकारकिर्दीची सुरुवात केली होती. पण प्रभास आता बॉलिवूड किंवा बॉलिवूडपर्यंतच मर्यादित राहिलेला नाही. ‘बाहुबली’नंतर जगभरात त्याच्या फॅनफॉलोईंगमध्ये तुफान वाढ झाली आहे. प्रभासने 2002 मध्ये प्रदर्शित झालेला ‘ईश्वर’ या तेलुगु सिनेमातून कारकीर्दीची सुरुवात केली होती.