Join us

‘बाहुबली’ बनण्याच्या नादात प्रभासनं घेतली मोठी रिस्क, आता ठरतेय डोकेदुखी!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2022 16:31 IST

Prabhas: होय, प्रभासचं वजन का वाढतंय? तो ते कमी का करू शकत नाहीये? याचं कारण आता समोर आलं आहे.

बाहुबली’ आणि ‘बाहुबली 2’साठी प्रभासनं (Prabhas ) बरंच वजन वाढवलं होतं. पण अलीकडे त्याचा ‘राधेश्याम’ हा सिनेमा रिलीज झाला.   या चित्रपटात प्रभास अगदी लीन लुकमध्ये दिसला. मात्र याच चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान तो पुन्हा हेवी वेट दिसू लागला. चित्रपट आणि प्रत्यक्षातील हा फरक पाहून चाहते शॉक्ड झालेत. सीजीआय टेक्निकच्या मदतीने ‘राधेश्याम’मध्ये प्रभासल स्लीम दाखवण्यात आल्याचं यानंतर मानलं गेलं. आता पुन्हा प्रभासच्या वजनाबद्दलचीच बातमी आहे. होय, प्रभासचं वजन का वाढतंय? तो ते कमी का करू शकत नाहीये? याचं कारण आता समोर आलं आहे.

ग्रेट आंध्राच्या रिपोर्टनुसार, प्रभास दीर्घकाळापासून गुडघ्याच्या दुखण्यानं त्रस्त आहे. डॉक्टरांनी त्याला गुडघ्याची सर्जरी करण्याचा सल्ला दिला आहे. या सर्जरीनंतर त्याला 3-4 महिने विश्रांत करावी लागणार आहे. तूर्तास तरी इतका मोठा ब्रेक घेणं प्रभाससाठी शक्य नाही. त्यामुळे तो गुडघ्याचं दुखणं सहन करतोय आणि त्याचं वजन वाढण्यामागंही हेच कारण आहे. या दुखण्यामुळे प्रभास पूर्ण वर्कआऊट करू शकत नाही. अनेक एक्सरसाइज त्याला स्किप कराव्या लागतात. त्यामुळे त्याचं वजन कमी करण्यात त्याला अडचणी येत आहेत.

‘बाहुबली’ सीरिजनंतर प्रभासच्या शरीरावर गंभीर परिणाम झाला. या चित्रपटासाठी बॉडी व मस्कुलर फिजीक बनवण्याच्या नादात प्रभासने स्वत:ला प्रचंड स्ट्रेच केलं. यानंतर वजन कमी करण्याची वेळ आली तेव्हा या दुखण्यानं डोकं वर काढलं. ‘बाहुबली’ सीरिजनंतर त्याने एका पाठोपाठ एक सिनेमे साईन केलेत. यादरम्यान अनेक गोष्टींकडे त्याचं दुर्लक्ष झालं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रभास खाण्याचा शौकीन आहे. अशास्थितीत वजन नियंत्रित ठेवणं त्याच्यासाठी कठीण काम आहे. त्याचा झोपेचा पॅटर्नही अनिश्चित आहे. तो रात्री उशीरा झोपतो आणि दुपारी उठतो. साहजिकच वजन सारखं वाढतंय आणि वाढतं वजन प्रभाससाठी डोकेदुखी ठरू लागलीये.

टॅग्स :प्रभासबाहुबली