Join us

सोशल मीडियावरही प्रभास ठरला 'बाहुबली' !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2019 09:28 IST

'साहो'मध्ये प्रभाससोबत श्रद्धा कपूर, नील नितीन मुकेश, जॅकी श्रॉफ, मंदिरा बेदी, महेश मांजरेकर आणि चंकी पांडे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

तमिळ आणि तेलूगु सिनेमाचा स्टार प्रभासची लोकप्रियता आधीपासूनच होती. मात्र बाहुबली- द बिगिनिंग आणि 'बाहुबली- द कन्कल्युजन' या सिनेमातील भूमिकेमुळे प्रभास रातोरात सुपरस्टार बनला. देशासह जगभरातील प्रभासची लोकप्रियता सर्वोच्च शिखरावर पोहचली आहे. आज प्रभासचे जगभरात कोट्यवधी चाहते आहेत. तो जे काही करतो त्याची चर्चा होते. त्याच्या आणखीन एका गोष्टीने सा-यांचे लक्ष वेधले आहे. ते म्हणजे काही दिवसांपूर्वीच प्रभासने इन्स्टाग्रामवर अकाऊंट सुरू केलं. इन्स्टाग्रामवर प्रभासची एंट्री होताच बघता बघता त्याचे लाखोंच्यावर फॉलोव्हर्स गेले.

 

विशेष म्हणजे प्रभासने इन्स्टावर एकही पोस्ट शेअर केली नाही, तसेच कोणतेही फोटोसुद्धा शेअर केले नाहीत. इतकेच नाही तर त्याने त्याचा प्रोफाईल फोटोही ठेवला नाही तरीही प्रभासच्या फॉलोव्हर्सची संख्याही सात लाखांच्यावर पोहचली आहे. आतापर्यंत सोसल मीडियावर फोटो आणि प्रत्येक गोष्ट शेअर करत कलाकारांच्या संख्येत भर पडत असते. मात्र प्रभास यासाठी अपवाद ठरला आहे. सोशल मीडियावर कोणत्याही गोष्टीची अपडेट न देता. इतके फॉलोव्हर्स असणारा प्रभासहा एकमेव अभिनेता असावा. 

सध्या तो साहोच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. प्रभास सिनेमासाठी सध्या चांगलीच मेहनत घेत आहे. या सिनेमात तो अ‍ॅक्शन सीन करताना दिसणार आहे. दिग्दर्शक सुजीत ही प्रत्येक अ‍ॅक्शन सीनकडे बारकाईने लक्ष देत आहेत. प्रत्येक सीनमध्ये प्रभास अतिशय प्रभावशाली दिसला पाहिजे यासाठी ते प्रयत्न करत आहेत.

'साहो'मध्ये प्रभाससोबत श्रद्धा कपूर, नील नितीन मुकेश, जॅकी श्रॉफ, मंदिरा बेदी, महेश मांजरेकर आणि चंकी पांडे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट भारतातील पहिला बहुभाषी सिनेमात असून एकाच वेळी हिंदी, तेलगू आणि तमिळ या भाषांमध्ये शूट केला गेला आहे. प्रभासला 'साहो' सिनेमात अ‍ॅक्शन करताना पाहणे कमालीचे ठरणार आहे. 

टॅग्स :प्रभास