Join us

'आदिपुरुष' मानधनातही आहे 'बाहुबली'; प्रभास ठरला देशातील सर्वात महागडा अभिनेता?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2021 12:18 PM

Prabhas: प्रभासने 'आदिपुरुष'साठी प्रचंड मानधन घेतलं असून या मानधनामुळे तो देशातील सर्वात महागडा अभिनेता ठरला आहे.

दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास हे नाव आज कोणत्याही व्यक्तीसाठी नवीन नाही. बाहुबली (Bahubali) या चित्रपटाच्या अपार यशानंतर प्रभास आज ग्लोबल आयकॉन म्हणून ओळखला जातोय. बॉक्स ऑफिसवर गाजलेल्या या चित्रपटानंतर प्रभास लवकरच 'आदिपुरुष' (adipurush) या चित्रपटात झळकणार आहे. मात्र, या चित्रपटासाठी प्रभासने अफाट मानधन घेतलं असून आज तो देशातील सर्वात महागडा अभिनेता ठरला आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, प्रभासने 'आदिपुरुष'साठी प्रचंड मानधन घेतलं असून या मानधनामुळे तो देशातील सर्वात महागडा अभिनेता ठरला आहे. या चित्रपटासाठी प्रभासने थोडेथोडके नव्हे तर तब्बल १५० कोटी रुपये घेतल्याचं सांगण्यात येत आहे.

"प्रभास, हा बॉलिवूडमधील कलाकारांपेक्षा मानधनाच्या बाबतीत प्रचंड पुढे आहे. त्याने आदिपुरुषसाठी १५० कोटी रुपये मानधन घेतलं आहे. इतकंच नाही तर सलमान खानला 'सुलतान' आणि 'टायगर जिंदा है' यासाठी या रक्कमेपेक्षा कमी मानधन मिळालं होतं.तर अक्षय कुमारलादेखील बेलबॉटमसाठी याहून कमी पैसे दिले होते", अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.

दरम्यान, सलमान खानने (salman khan) ‘सुलतान’ आणि ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटासाठी १०० कोटींपेक्षा अधिक फी घेतली होती. तर अक्षय कुमारने (akshay kumar) ‘बेल बॉटम’साठी १०० कोटी रुपये मानधन घेतले होते. परंतु, प्रभासने या अभिनेत्यांना मागे टाकत ‘आदिपुरुष’साठी तब्बल १५० कोटी रुपये फी घेतल्याची सांगण्यात येत आहे.

टॅग्स :प्रभासबॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमाअक्षय कुमारसलमान खान