Join us

प्रभासचा अ‍ॅक्शन मोड ऑन, 'सालार' चा दमदार टीझर रिलीज, काही तासातच लाखो व्ह्यूज

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2023 09:19 IST

टीझर पाहून चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झालाय.

'केजीएफ' फिल्ममेकर प्रशांत नीलच्या 'सालार' सिनेमाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. प्रभास (Prabhas) सिनेमात मुख्य भूमिकेत आहे. टीझर पाहून चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झालाय. १ मिनिटांचा हा टीझर चाहत्यांना खिळवून ठेवण्यात यशस्वी झालाय. यात प्रभासची शेवटी झलक दिसते. टीझर रिलीज होताच अर्ध्या तासातच यु्टयूबवर अडीच लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.

टीझरच्या सुरुवातीलाच एक व्यक्ती गाडीवर बसला आहे आणि त्याच्याबाजूने अनेक लोक बंदुका आणि हत्यार घेऊन येत आहेत. तेव्हा तो म्हणतो सिंपल इंग्लिश, नो कन्फ्युजन. आय अॅम चिता, टायगर, एलिफंट, वेरी डेंजरस बट नॉट इन ज्युरासिक पार्क. हा व्यक्ती आहे टीनू आनंद जो 'सालार' मध्ये मुख्य भूमिकेत आहे. यानंतर सीन कट होऊन प्राभासची झलक दिसते. टीझरमध्ये प्रभासशिवाय पृथ्वीराज सुकुमारनचीही झलक दिसते जो व्हिलनच्या भूमिकेत आहे.

'सालार' किती दमदार असणार आहे हे प्रशांत नीलने टीझरमधूनच दाखवलं आहे. आता चाहत्यांना सिनेमाच्या रिलीजची प्रतिक्षा आहे. टीझरमध्येच सगळंच आहे जे चाहत्यांना त्यांच्या सीटवर खिळवून ठेवेल. सोशल मीडियावर टीझर व्हायरल होतोय. 

'सालार' 28 सप्टेंबर रोजी रिलीज होत आहे. फिल्ममध्ये प्रभासशिवाय टीनू आनंद, पृथ्वीराज सुकुमारन, श्रुती हसन आणि जगपति बाबू यांचीही मुख्य भूमिका आहे. सिनेमा हिंदी, कन्नड, तमिळ, तेलुगू आणि मल्याळम भाषेत रिलीज होणार आहे. 'सालार' च्या पहिल्या भागाचं टायटल 'सालार : सीझफायर' असणार आहे. या फिल्ममधून प्रभास आणि प्रशांत नील पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. 'आदिपुरुष'नंतर प्रभासचा 'सालार' रिलीज होत आहे.

टॅग्स :प्रभासकेजीएफसिनेमा