फिल्म इंडस्ट्रीत उगवत्या सूर्याला नमस्कार केला जातो, असे म्हणतात. हिच इथली प्रथा आहे. साहजिकच जितकं नाव, तितका पैसा, ग्लॅमर हे इथं ठरलेलं. जितका मोठा सेलिब्रिटी तितकी मोठी त्याची ब्रँड व्हॅल्यू. होय, याच जोरावर मोठ मोठ्या ब्रँडच्या जाहिरातीत मोठं मोठे स्टार्स दिसतात. चित्रपटांसोबतच या जाहिरातींमधूनही स्टार्स बक्कळ पैसा कमावतात. काही मिनिटांच्या एका जाहिरातींसाठी कोट्यावधी रूपये घेतात. अर्थात काही स्टार्स याला अपवाद म्हणावे लागतील. साऊथचा सुपरस्टार प्रभास (Prabhas)त्यापैकीच एक. होय, प्रभासवर आज कुणीही कितीही पैसा लावायला तयार आहे. पण प्रभासचे म्हणाल तर, पैशांसाठी मिळेल त्या जाहिराती करणं त्याला मान्य नाही. गेल्या वर्षभरात प्रभासनं 150 कोटींपेक्षा अधिकच्या जाहिराती नाकारल्या आहेत. (Prabhas rejected 150 crores brand endorsements in last one year )
इंडस्ट्रीशी संबंधित एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, प्रभास इंडस्ट्रीतलं एक मोठ नावं आहे. देशातच नाही तर विदेशातही त्याची लोकप्रियता आहे. बाहुबली या सिनेमानंतर तर तो सिनेप्रेमींच्या गळ्यातील ताईत बनला आहे. साहजिकच यादरम्यान त्याची ब्रँड व्हॅल्यूही वाढली आहे. पण असे असूनही प्रभासने गेल्या वर्षात अनेक मोठ्या ब्रँडच्या जाहिरातींना नकार दिला. या जाहिरातींमधून प्रभास 150 कोटी कमावले असते. पण त्याने या कोट्यावधी रूपयांवर पाणी सोडले.
प्रभासला जाहिराती करायच्या नाहीत, हे या नकारामागचे कारण नाही. कारण तो जाहिराती करतो आणि यापुढेही करणार आहे. पण ब्रँड व त्याच्या जाहिराती निवडताना तो विचारपूर्वक निर्णय घेतो. निवडक आणि विश्वासू ब्रँड सोबतच तो काम करण्याला पसंती देतो आणि हिच त्याची खासियत आहे. प्रभास सध्या ज्या उंचीवर आहे, त्याचे महत्त्व तो जाणतो आणि या यशाचा चतुराईने वापर करण्यावर त्याचा विश्वास आहे. त्याच्या याच स्वभावामुळे तो इतरांपेक्षा वेगळा फिल्मी भाषेत सांगायचे तर एक्सक्लुसिव्ह ठरतो.प्रभासच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर लवकरच त्याचा ‘राध्ये-श्याम’ सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या बिग बजेट सिनेमात प्रभाससोबत पूजा हेगडे लीड रोलमध्ये आहे. येत्या काळात सलार आणि आदिपुरुष या सिनेमातही तो झळकणार आहे.