Join us  

पाकिस्तानी अभिनेत्रीबरोबर रोमान्स करणार प्रभास, कोण आहे ती? श्रीदेवी सोबतही केलंय काम

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2024 10:51 AM

'कल्कि 2898 AD' सिनेमातून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्यानंतर आता पुन्हा एकदा तो प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. प्रभास त्याच्या नव्या सिनेमात पाकिस्तानी अभिनेत्रीबरोबर स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.

प्रभास हा दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील आघाडीचा अभिनेता आहे. बाहुबली सिनेमामुळे रातोरात स्टार झालेल्या प्रभासने अनेक सुपरहिट मालिकांमध्ये काम केलं आहे. अलिकडेच त्याचा 'कल्कि 2898 AD' सिनेमा प्रदर्शित झाला. या सिनेमातून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्यानंतर आता पुन्हा एकदा तो प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. प्रभास त्याच्या नव्या सिनेमात पाकिस्तानी अभिनेत्रीबरोबर स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. 

मीडिया रिपोर्टनुसार, नव्या सिनेमात प्रभास आणि पाकिस्तानी अभिनेत्री सजल अली ही नवी कोरी जोडी दिसणार आहे. या सिनेमाचं नाव अद्याप समोर आलेलं नाही. पण, हाऊस माइथ्री मूव्ही मेकर्स या तेलुगु प्रॉडक्शनद्वारे या सिनेमाची निर्मिती केली जाणार आहे. तर सीता रामम सिनेमाचे दिग्दर्शक हनु राघवपुडी सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत. 

या सिनेमातून पाकिस्तानी अभिनेत्री सजल अली बॉलिवूडमध्ये पुनरागमन करत आहे. प्रभासबरोबर ती रोमान्स करताना दिसणार आहे. सजलने अनेक मालिका आणि सिनेमांमध्येही काम केलं आहे. तिने श्रीदेवी यांच्याबरोबरही काम केलं आहे. मॉम या सिनेमात ती झळकली होती. तिने वेब सीरिजमध्येही काम केलं आहे. आता ती प्रभासबरोबर सिनेमात झळकणार आहे. 

दरम्यान, अलिकडेच प्रदर्शित झालेल्या 'कल्कि 2898 AD' सिनेमात प्रभासने मुख्य भूमिका साकारली आहे. या सिनेमात प्रभासबरोबर दीपिका पादुकोण आणि अमिताभ बच्चनही मुख्य भूमिकेत आहेत. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तब्बल १००० कोटींचा गल्ला जमवला आहे. 

टॅग्स :प्रभाससेलिब्रिटीसिनेमा