‘बाहुबली’ (Bahubali) या सिनेमानंतर जगभरातील चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनलेला साऊथ सुपरस्टार प्रभासचा (Prabhas) ‘राधे-श्याम’ (Radhe Shyam) हा सिनेमा येत्या काळात प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. या रोमॅन्टिक ड्रामात अभिनेत्री पूजा हेगडे (Pooja Hegde) प्रभाससोबत रोमान्स करताना दिसणार आहे. चित्रपटाचं शूटींग जवळजवळ पूर्ण झालंय आणि लीड अॅक्टर्सचा फर्स्ट लुकही रिलीज झाला आहे. या सिनेमात प्रभास दीर्घकाळानंतर लव्हर बॉयच्या भूमिकेत दिसणार आहे. साहजिकच चाहते उत्सुक आहेत. या सिनेमाच्या बजेटबद्दल बोलाल तर हा प्रभासच्या करिअरमधील सर्वाधिक महागड्या सिनेमांपैकी एक आहे.
होय, लव्हस्टोरी असूनही या सिनेमावर अगदी पाण्यासारखा खर्च केला जातोय. 100 कोटी तर नुसते सेट उभारण्यावर खर्च झाले आहेत. चित्रपटाशी संबंधित एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, प्रभासच्या या आगामी सिनेमासाठी 26 सेट्स उभारण्यात आलेत. यावर निर्मात्यांनी 106 कोटी रूपये खर्च केलेत. युव्ही क्रिएशन व गोपीचंद पिक्चर्सने टी-सीरिजसोबत मिळून हा सिनेमा बनवला आहे. मेकर्सच्या मते, प्रभासच्या लोकप्रियतेसमोर 100- 150 कोटी ही रक्कम अगदीच मामुली आहे. ‘बाहुबली’नंतर प्रभास भारतातील सर्वात मोठा स्टार बनला आहे आणि त्यामुळे मेकर्स त्याच्यावर पैसा लावण्यास तयार आहेत.
प्रभासच्या कॉस्ट्यूमसाठी निर्मात्यांनी 6 कोटींचा खर्च केल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर सिनेमातल्या एका काही मिनिटांच्या सीनसाठी कोट्यवधींचा खर्च केल्याचं बोललं गेलं होतं. काही मिनिटांच्या या सीनसाठी जवळपास 1.5 कोटी रुपयांचा खर्च केल्याची चर्चा होती.हा सीन नयनरम्य रोम शहरातील आहे पण याचं शूटिंग मात्र भारतात केलं गेलं आहे. पडद्यावर पाहताना कुठेही डमी वाटू नये म्हणून भारतातच रोम शहराचा हुबेहुब वाटावा असा सेट तयार करण्यात आला होता. या सेटवर प्रचंड मेहनत घेण्यात आली आहे.
प्रभासचा ‘राधे-श्याम’ एक बहुभाषिक सिनेमा असणार आहे जो हिंदी, तेलुगू, इंग्लिश अशा वेगवेगळ्या 6 भाषेत प्रदर्शित करण्यात येणार आहे. प्रभास आणि पूजा व्यतिरिक्त या चित्रपटात सचिन खेडेकर, भाग्यश्री, मुरली शर्मा, कुणाल रॉय कपूर चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. ‘राधे-श्याम’ सिनेमाशिवाय प्रभास ‘आदिपुरूष’ चित्रपटात झळकणार आहे. हा सुद्धाबिग बजेट चित्रपट असून या चित्रपटाचाबजेट 400 कोटी रुपये आहे. ओम राऊतच्या या चित्रपटात प्रभास राम आणि सैफ अली खान लंकेशच्या भूमिकेत दिसणार आहेत.