हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा आणि खतरनाक खलनायक कोण असा प्रश्न विचारल्यास सगळ्यात पहिलं नाव येतं ते म्हणजे अभिनेता प्रकाश राजचं. अभिनयाशी प्रकाश राजचा गेल्या अनेक वर्षांपासून संबंध आहे. मात्र हिंदी चित्रपटसृष्टीत प्रकाश राजने वॉन्टेड सिनेमातून एंट्री केली. या सिनेमातील प्रकाश राजने साकारलेला खलनायक रसिकांना चांगलाच भावला.
पहिल्याच हिंदी सिनेमातून त्याने रसिकांवर जादू केली. यानंतर सिंघम सिनेमातील जयकांत शिखरे तर रसिक विसरुच शकणार नाहीत. प्रकाश राजने साकारलेला जयकांत शिखरे रसिकांच्या मनात घर करुन गेला आहे. 26 मार्च 1965 रोजी कर्नाटकच्या बंगळुरुमध्ये जन्म झालेला प्रकाश राज गेली अनेक वर्षे दाक्षिणात्य सिनेमात सक्रीय आहे. दूरदर्शनवरील मालिकेतून त्याला अभिनयाची संधी मिळाली होती. बॉलीवुड आणि दाक्षिणात्य सिनेमात अभिनेता साकारण्यासोबत दिग्दर्शक तसंच निर्माता म्हणूनही त्याने जबाबदारी पार पाडली आहे. हे तर झालं प्रकाश राजच्या व्यावसायिक जीवनाविषयी. मात्र त्याचं खासगी आणि वैयक्तीक जीवनही तितकंच सुंदर आहे. त्याच्या वैयक्तीक जीवनाच्या सुंदरतेचं महत्त्वाचं कारण म्हणजे त्याची पत्नी पोनी वर्मा.
प्रकाश राज यांनी 2010 मध्ये पोनी वर्माशी लग्न केले आणि दोघांच्या लग्नाला 11 वर्षे झाली आहेत आणि त्यांना 5 वर्षांचा मुलगाही आहे. तसे, त्याच्या मुलाला त्याच्या आई-वडिलांचे लग्न बघायचे होते, त्यामुळे प्रकाश राज आणि पोनी वर्मा यांनी पुन्हा लग्न केले आणि एक मोठा कार्यक्रम ठेवला. मुलाच्या आग्रहापुढे प्रकाश राज यांना नमतं घ्यावच लागलं. मुलाच्या आग्रहाखातर त्यांना पुन्हा लग्न करावे लागले.
प्रकाश राज आणि पोनी वर्मा यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. या वर्षी ऑगस्ट महिन्यात दोघांनी लग्न केले आणि त्यांच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत .ज्यात प्रकाश राज आणि पोनी वर्मा किस करताना दिसत आहेत.
पोनी वर्मा ही एक प्रसिद्ध कोरिओग्राफर आहे. बॉलीवुडच्या अनेक सिनेमात पोनी वर्माने कोरिओग्राफर म्हणून जबाबदारी पार पडली आहे. पोनी वर्मा सोशल मीडियावर बरीच एक्टिव्ह असते. आपल्या पतीसह आकर्षक फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते. हे फोटो पाहून तुम्हीही पोनीच्या सौंदर्यावर फिदा व्हाल. तिचे घायाळ करणारे सौंदर्य कमाल आहे असे शब्द तुमच्या ओठावर आपसुकच येतील.