Join us

‘India vs भारत’ वादावरुन प्रकाश राज यांची मोदी सरकारवर जहरी टीका, म्हणाले, “कपडे बदलणाऱ्या विदुषकाचं...”

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2023 12:24 IST

India vs Bharat : प्रकाश राज यांनी ट्वीटमधून मोदी सरकारवर साधला निशाणा

मोदी सरकारच्या देशाचं नाव इंडियावरुन भारत करण्याच्या मुद्द्यावर देशभरात राजकारण तापलं आहे. संसदेच्या विशेष अधिवेशनात मोदी सरकार याबाबत प्रस्ताव मांडण्याची शक्यता आहे. जी२० परिषदेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपतींच्या स्नेहभोजनातील पत्रिकेवरही प्रेसिडेंट ऑफ इंडियाऐवजी प्रेसिडेंट ऑफ भारत असा उल्लेख करण्यात आला आहे. यावरुन राजकीय नेत्यांबरोबरच सेलिब्रिटीही व्यक्त होत आहेत. आता प्रकाश राज यांनी इंडिया विरुद्ध भारत वादात उडी घेतली आहे.

प्रकाश राज हे सोशल मीडियावर सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. समाजातील अनेक घडामोडींवर ते अगदी परखडपणे मतं मांडताना दिसतात. काही दिवसांपूर्वीच इस्त्रोच्या चांद्रयान ३बाबत केलेल्या ट्वीटमुळे त्यांना ट्रोल करण्यात आलं होतं. आता प्रकाश राज यांनी इंडिया विरुद्ध भारत या मुद्द्यासंदर्भात केलेलं ट्वीट चर्चेत आहे. या ट्वीटमधून त्यांनी मोदी सरकारवर अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला आहे. “सर्व्हे ऑफ इंडिया....कपडे बदलणाऱ्या विदुषकाचं नाव सांगा जो निवडणुकीच्या ड्रामासाठी देशाचंही नाव बदलत आहे,” असं प्रकाश राज यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. त्यांचं हे ट्वीट व्हायरल झालं असून त्यावर अनेकांनी कमेंटही केल्या आहेत.

“दिग्दर्शकाला भेटायला गेले तेव्हा...”, गिरीजा ओकने सांगितला ‘जवान’चा अनुभव, म्हणाली, “मी दोन वर्ष...”

प्रकाश राज यांच्या बरोबरच अमिताभ बच्चन आणि जकी श्रॉफ यांनीही यासंदर्भात प्रतिक्रिया दिली होती. “भारत माता की जय” असं बिग बींनी ट्वीटमध्ये म्हटलं होतं. तर जॅकी श्रॉफ "जर तुम्हाला भारताला भारत म्हणायचे आहे. तर काय वाईट गोष्ट नाही. इंडिया म्हणायचे आहे तर इंडियाही ठीक आहे. आता माझे नाव जॅकी आहे. मला कोणी जॉकी तर कोणी जाकी नावाने हाक मारते. नाव बदललं याचा अर्थ मी बदलत नाही. नाव बदललं तर तुम्ही 'इंडियन' आहात हे विसरू नका", असं म्हटलं होतं.

टॅग्स :प्रकाश राजभारतसेलिब्रिटीनरेंद्र मोदी