Join us

आठवडाभर चर्चेत होती प्रनूतन बहल, पदार्पणापूर्वी 'बहल' आडनाव लावायचे टाळायची 'ती', जाणून या मागचे कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2019 20:00 IST

गतवर्षी अनेक स्टारकिड्सनी बॉलिवूडमध्ये एंट्री घेतली. त्या लिस्टमध्ये आता आणखी एक नावाची भर पडली आहे. गेल्या आठवड्यापासून बी-टाऊनमध्ये प्रनूतन बहल या नावाची चर्चा होती.

ठळक मुद्देसोशल मीडियावर प्रनूतनचे अनेक फोटो व्हायरल झाले होतेस्टारकिड्स असून ही प्रनूतन ही ‘बहल’ हे आडनाव लावणे टाळायची

गतवर्षी अनेक स्टारकिड्सनी बॉलिवूडमध्ये एंट्री घेतली. त्या लिस्टमध्ये आता आणखी एक नावाची भर पडली आहे. गेल्या आठवड्यापासून बी-टाऊनमध्ये प्रनूतन बहल या नावाची चर्चा होती. सोशल मीडियावर प्रनूतनचे अनेक फोटो व्हायरल झाले होते. प्रनूतन या स्टारकिड्सने नोटबूक सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. 

प्रनूतनला तिच्या बाबांचा मित्र सलमान खानने त्याच्या प्रॉडक्शन अंतर्गत लाँच केले, प्रनूतन ही मोहनीश बहल यांची मुलगी आहे तर नुतन यांची नात आहे. प्रनूतन हिच्या अभिनयाचे कौतूक सिनेमा रिलीज होताच सगळ्याकडे होतेय. प्रनूतनची आत्या काजोल हिने सुद्धा तिला सिनेमा रिलीज होण्याच्या आधी सोशल मीडियावरुन शुभेच्छा दिल्या होत्या. 

स्टारकिड्स असून ही प्रनूतन ही ‘बहल’ हे आडनाव लावणे टाळायची. कारण तिला स्वबळावर बी-टाऊनमध्ये आपलं  स्थान निर्माण करायचे होते. एका मुलाखती दरम्यान तिने सांगितले होते की,  २०१६ मध्ये मी आॅडिशन्स देणे सुरु केले.

 त्याकाळात मी माझ्या नावापुढे ‘बहल’ हे आडनाव लावणे टाळायचे. कारण एकच होते, जे काही मिळवायचे ते मला स्वबळावर मिळवायचे होते. पापा आणि आजी यांच्या नावाचा, लौकिकाचा वापर न करता मला ही परीक्षा पास करायची होती.

माझ्यामते, अभिनेत्री बनायचे तर एक प्रक्रिया पाळणे गरजेचे होते. मी तेच केले. नोटबुक हा सिनेमा प्रनूतनला तिचे सोशल मीडियावरील फोटो पाहुन मिळाल्याचे तिने सांगितले.

तिचे फोटो पाहून सिनेमाच्या टीमला ती या भूमिकेसाठी एकदम योग्य असल्याचे वाटले आणि त्यांनी तिला  भेटायला बोलवल्याचे तिने सांगितले होते. ऐकूणच काय तर पदार्पणतच प्रनूतन हिने सगळ्यांची मनं आपल्या अभिनयाच्या जोरावर जिंकली आहे.   

टॅग्स :प्रनूतन बहलनोटबुक