Join us  

प्रसाद ओकच्या एन्ट्रीने बॉलिवूडमध्ये उडणार 'धुरळा'; मौनी रॉयसोबत शेअर करणार स्क्रीन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2024 9:45 AM

Prasad oak: प्रसादसोबत मौनी रॉय, विक्रांत मेस्सी, छाया कदम यांसारखे कलाकार स्क्रीन शेअर करणार आहेत.

मराठी कलाविश्वातील नावाजलेला आणि आघाडीचा अभिनेता म्हणजे प्रसाद ओक (Prasad oak). अभिनेता असण्यासोबतच त्याने दिग्दर्शक आणि निर्माता म्हणूनही उत्तम जबाबदारी पार पाडली. गेल्या तीन-चार वर्षात त्याने अनेक वेगवेगळ्या पठडीतील सिनेमांची निर्मिती केली. इतकंच नाही तर हे सिनेमा बॉक्स ऑफिसवर गाजले सुद्धा. विशेष म्हणजे मराठी सिनेइंडस्ट्री गाजवल्यानंतर प्रसाद आता बॉलिवूड (bollywood) गाजवण्यास सज्ज झाला आहे. लवकरच तो विक्रांत मेस्सीसोबत स्क्रीन शेअर करणार आहे.

नाटक, मालिकांपासून अभिनयाची कारकिर्द सुरु करणाऱ्या प्रसादने अथक मेहनत, चिकाटी आणि प्रयत्न यांच्या जोरावर त्याच्या करिअरचा आलेख उंचावत नेला. यामध्येच आता त्याच्यासाठी बॉलिवूडचे दरवाजे उघडले आहेत.  प्रसाद लवकरच एका बॉलिवूडपटात झळकणार असून याविषयीची माहिती त्याने स्वत: सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे.

या बॉलिवूड सिनेमात झळकणार प्रसाद

प्रसादने इन्स्टाग्रामवर त्याच्या आगामी सिनेमाचं पोस्टर शेअर केलं आहे. त्यानुसार, ब्लॅक आऊट असं त्याच्या आगामी बॉलिवूड सिनेमाचं नाव आहे. या सिनेमात त्याच्यासोबत विक्रांत मेस्सी, मौनी रॉय, सुनील ग्रोवर, रोहानी शर्मा, जिशू सेन गुप्ता, सौरभ घाडगे, अनंत जोशी आणि छाया कदम ही कलाकार मंडळी स्क्रीन शेअर करणार आहेत.

काय आहे प्रसादची भूमिका

प्रदर्शित झालेल्या पोस्टरमधून ब्लॅक आऊट या सिनेमात प्रसाद एका पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे आता त्याचा हा नवा कोरा बॉलिवूडपट पाहण्यासाठी चाहते कमालीचे उत्सुक आहेत.

टॅग्स :प्रसाद ओक विक्रांत मेसीमौनी राॅयबॉलिवूडसिनेमा