अभिनेत्री स्मिता पाटील आणि अभिनेते व राजकीय नेते राज बब्बर यांचा मुलगा प्रतीक बब्बर आज गर्लफ्रेन्ड सान्या सागरसोबत लग्नबंधनात अडकणार आहे. होय, गतवर्षी वसंत पंचमीच्या मुहूर्ताला म्हणजेच २२ जानेवारीला प्रतीक व सान्याचा साखरपुडा झाला होता. यानंतर बरोबर वर्षभरानी प्रतीक व सान्या लग्नाच्या आणाभाका घेतील. लखनौ येथे काल २२ जानेवारीपासून हळद आणि मेहंदी अशा लग्नाच्या विधींना सुरूवात झाली. तूर्तास या दोन्ही सेरेमनीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. या फोटोत प्रतिक व सान्या दोघेही एकमेकांसोबत अतिशय आनंदी दिसत आहेत.
पाहा, प्रतिक बब्बर व सान्या सागरच्या मेहंदी व हळद सेरेमनीचे फोटो!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2019 09:53 IST
अभिनेत्री स्मिता पाटील आणि अभिनेते व राजकीय नेते राज बब्बर यांचा मुलगा प्रतीक बब्बर आज गर्लफ्रेन्ड सान्या सागरसोबत लग्नबंधनात अडकणार आहे.
पाहा, प्रतिक बब्बर व सान्या सागरच्या मेहंदी व हळद सेरेमनीचे फोटो!!
ठळक मुद्देगेल्या आठ वर्षांपासून सान्या व प्रतीक एकमेकांना ओळखतात. पण गत दोन वर्षांपासून ते रिलेशनशिपमध्ये आहेत. सान्या ही मूळची लखनौची आहे.