Join us

सर्वाधिक मानधन घेणा-या अभिनेत्रीची अखेरच्या दिवसात झाली होती अशी अवस्था,ओळखणेही झाले होते कठिण,आत्महत्या करत संपवले जीवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2020 3:14 PM

खरंतर परवीन बाबीच त्यांच्या लकी चार्म होत्या आणि त्यांच्याच मुळे महेश भट्ट बॉलिवूडमध्ये स्वतःचे स्थान निर्माण करू शकले. त्यामुळे महेश भट्ट आजही त्यांच्या या यशाचे श्रेय परवीन बाबी यांना द्यायला विसरत नाहीत.

महेश भट्ट यांचे नाव घेताच डोळ्यासमोर येतात त्यांच्या कॉन्ट्रोव्हर्सी...बॉलिवूडमधील प्रसिद्ध नाव असलेले महेश भट्ट यांनी त्यांच्यावर होणा-या टीकांनाही फारसे महत्व दिले नाही. सुरूवातीपासूनच लव्ह सेक्स आणि कॉन्ट्रोव्हरसी यांनी महेश भट्ट यांना घेरले आहे. जेव्हा चंदेरी दुनियेत महेश भट्ट यांनी आपले पहिले पाऊल ठेवले तेव्हा त्यांच्या सिनेमांना फारसे यश मिळायचे. नाही मात्र बॉलिवूडची अभिनेत्री परवीन बाबीची भट्ट यांच्या आयुष्यात एंट्री होताच भट्ट यांच्याकडे भरभराटी झाली. खरंतर परवीन बाबीच त्यांच्या लकी चार्म होत्या आणि त्यांच्याच मुळे महेश भट्ट बॉलिवूडमध्ये स्वतःचे स्थान निर्माण करू शकले. त्यामुळे महेश भट्ट आजही त्यांच्या या यशाचे श्रेय परवीन बाबी यांना द्यायला विसरत नाहीत.

परवीन बाबी यांची आत्महत्या होती की हत्या ? हे आजपर्यंत कोणी सांगू शकले नाही. 'दिवार', 'अमर अकबर अन्थॉनी', 'सुहाग, कालिया', 'नमक हलाल' यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये परबीन बाबी यांनी मुख्य भूमिका साकारली होती. त्यांच्या सगळ्याच भूमिका प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या. परबीन बाबी यांनी सत्तर आणि ऐंशीचा काळ गाजवला असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही.

परवीन बाबी या त्या काळातील सगळ्यात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक होत्या. त्यांचे करियर अतिशय जोमात असताना त्यांना पॅरानॉईड स्क्रिझोफ्रेनिया झाला आणि त्या बॉलिवूडपासून दूर गेल्या. त्यांचे निधन व्हायच्या कित्येक वर्षं आधीपासून त्या एकट्याच राहात होत्या.त्यांच्या निधनाविषयी त्यांच्या सोसायटीच्या सेक्रेटरीने पोलिसाना कळवले होते.

त्यांनी पोलिसांना फोन करून सांगितले होते की, त्या दोन दिवस कोणालाच दिसल्या नव्हत्या. तसेच त्यांच्या दरवाज्यात दूध आणि वर्तमानपत्रं दोन दिवसांपासून तशीच पडलेली होती. त्यामुळे पोलिसांनी ड्युप्लिकेट चावीच्या मदतीने दरवाजा उघडला होता. त्यावेळी त्या मृत अवस्थेत आढळल्या होत्या. त्या घरात एकट्यात राहात असल्याने त्यांचे निधन कधी झाले हे कोणालाच कळले नव्हते.