ही गोष्ट आहे त्या काळची जेव्हा सिनेमात नटी आणि नट्यांच्या रंग आणि रुपावर जास्त लक्ष दिले जात होते. जर कुणी सावळं असेल तर त्याला काम करण्याची संधी मिळत नसे. जुन्या सिनेमांमध्ये हिरोदेखील हिरॉईनसारखा मेकअप करत होते. ज्यावेळी बॉलिवूडचा सिंघम म्हणजेच अजय देवगणने हिरो बनण्याचा विचार केला तेव्हा त्याची थट्टा करणारे बरेच लोक होते. अजय दिसायला साधारण होता. पण त्याने कधीच स्वतःला कमी लेखले नाही. याउलट त्याने हँडसम म्हणणाऱ्या हिरोंच्या तुलनेत जास्त यश मिळवले.
फाइट मास्टर वीरू देवगण यांचा मुलगा अजय देवगणने जेव्हा फूल और काँटे चित्रपट साइन केले तेव्हा लोकांनी निर्माते-दिग्दर्शकांना समजावले की कोणत्या हिरोला घेत आहात. चित्रपट पहिल्याच शोपासून फ्लॉप होऊन जाईल. अजयच्या चेहरा आणि रंगावरून खूप खिल्ली उडवली गेली.
पण अमिताभ बच्चन यांचे मत खूप वेगळे होते. अमिताभ बच्चन यांनी अजय देवगणच्या चेहऱ्यामागील अभिनेत्याला ओळखलं होतं. त्यांनी अजयला डार्क होर्स म्हटलं. याचा अर्थ असा की असा माणूस ज्याच्या विजयावर कुणाला विश्वास असो किंवा नसो पण तो नंबर वनच येणार आहे. बिग बींची ही भविष्यवाणी खरी ठरली आणि अजय देवगण बॉलिवूडमधील स्टार ठरला.