सोनम कपूरच्या चेहऱ्यावर आलाय प्रेग्नेंसी ग्लो, रॉयल अंदाजात फ्लॉन्ट केलं बेबी बंप
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2022 01:25 PM2022-04-04T13:25:05+5:302022-04-04T13:25:30+5:30
सोनम कपूर(Sonam Kapoor)ने लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिने तिचे बेबी बंप फ्लॉन्ट करतानाचे फोटो शेअर केले आहेत. सोनमचे व्हाइट आउटफिटमधील फोटोशूट इंटरनेटवर व्हायरल होत आहे.
बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर(Sonam Kapoor)ने गेल्या महिन्यातच तिच्या प्रेग्नेंसीची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली. सोनम आणि आनंद आहुजा लवकरच आई-वडील होणार आहेत. दरम्यान आता अभिनेत्रीने तिचे बेबी बंप फ्लॉन्ट करतानाचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोत तिच्या चेहऱ्यावर प्रेग्नेंसी ग्लो पाहायला मिळतो आहे.
सोनम कपूरने लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती रॉयल लूकमध्ये सुंदर दिसत आहे. अभिनेत्रीच्या या फोटोंवरून तुमची नजर हटणार नाही. सोनमचे व्हाइट आउटफिटमधील फोटोशूट इंटरनेटवर व्हायरल होत आहे. हेवी ज्वेलरी, मोकळे केस यामध्ये ती परीपेक्षा कमी दिसत नाही. फोटोंमध्ये तिचा बेबी बंप स्पष्ट दिसत आहे.
सोनम कपूरच्या या फोटोंवर चाहते कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. फोटोंवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले, तुम्ही खूप सुंदर दिसत आहात. एका इंस्टा यूजरने लिहिले की, खूप सुंदर. आणखी एका युजरने लिहिले, तू ग्रीक देवीसारखी दिसतेस. आणखी एका युजरने लिहिले, स्टनिंग. अनेक यूजर्सनी त्याचे अभिनंदनही केले आहे.
बेबी बम्प फ्लाँट करत ब्लॅक मोनोकिनीमध्ये पती आनंद अहुजासोबतचे फोटो सोनमने शेअर केले आहेत. फोटो शेअर करत चाहत्यांना सोनमने ही गुड न्यूज दिली आहे. सोनमने फोटो शेअर करत लिहिले की, ‘चार हात, जे तुझी जमेल तितकी काळजी घेतील. दोन ह्रदये जी तुझ्या सोबत धडधडतील. एक कुटुंब जे तुला प्रेम आणि पाठींबा देईल. आम्ही तुझ्या आगमनाची वाट पाहत आहोत.’