Join us

के एल राहुलला पाठिंबा देण्यासाठी अथिया शेट्टीचा ऑस्ट्रेलिया दौरा; चेहऱ्यावर दिसला प्रेग्नेंसी ग्लो

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2024 13:19 IST

अथिया शेट्टी आणि भारतीय क्रिकेटपटू के ए राहुल लवकरच आई-बाबा होणार आहेत.

बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टी (Athiya Shetty) ही कायम चर्चेत असते. सध्या अभिनेत्री तिच्या प्रेग्नेंसीमुळे चर्चेत आहे. अथिया शेट्टी आणि भारतीय क्रिकेटपटू के ए राहुल (K L Rahul) लवकरच आई-बाबा होणार आहेत. सध्या या जोडप्याचं आयुष्य आनंदाने भरलेलं आहे. या काळात अथिया आणि के ए राहुल हे एकमेंकासोबत जास्तीत जास्त वेळ घालवायचा प्रयत्न करत आहेत. के ए राहुल सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे.  तर आथियानेही त्याच्या पाठोपाठ ऑस्ट्रेलिया गाठलं

अथिया शेट्टी नुकतीच ऑस्ट्रेलियाला जाताना दिसली. पापाराझींना विमानतळावर ती स्पॉट झाली. आथिया बेबी बंप अजून दिसत नसला तरी तिचा प्रेग्नेंसी ग्लो मात्र नक्कीच दिसतोय. अभिनेत्रीने कॉटनचा सूट परिधान केला होता. तर त्यावर मॅचिंग दुपट्टा घेतला. यावेळी अथिया नो मेकअप लूकमध्ये दिसली. विशेष म्हणजे प्रेग्नेंसीच्या घोषणेनंतर अथिया पहिल्यांदाच सार्वजनिकरित्या स्पॉट झाली आहे. अभिनेत्रीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

अथिया लग्नाच्या दीड वर्षानंतर आई होणार आहे.पुढील वर्षी अथिया शेट्टी बाळाला जन्म देणार आहे. सुनील शेट्टी आजोबा होणार असल्याने आनंदात आहेत. गेल्या वर्षी २३ जानेवारी २०२३ रोजी अथिया आणि लोकेश राहुल यांनी लग्नगाठ बांधली. आता दोघेही आयुष्यातील नव्या इनिंगला सुरुवात करत आहेत. 

टॅग्स :अथिया शेट्टी लोकेश राहुल