Join us

६ महिन्यांच्या गरोदर दीपिकाला हाय हिल्स घातलेले पाहून भडकले नेटकरी, म्हणाले - "गरोदरपणात हिल्स घालणं..."

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2024 11:20 AM

ग्लॅमरस लूक केलेल्या दीपिकाने ड्रेसवर हाय हिल्स घातले होते. गरोदर दीपिकाला हाय हिल्स घातलेले पाहून मात्र नेटकरी भडकले.

बॉलिवूडचं लोकप्रिय सेलिब्रिटी कपल दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह लवकरच आईबाबा होणार आहेत. दीपिका-रणवीरने काही महिन्यांपूर्वीच सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही गुडन्यूज चाहत्यांना दिली. त्यानंतर पहिल्यांदाच दीपिकाने बेबी बंपचे फ्लॉन्ट करतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. दीपिकाने आगामी सिनेमा कल्की सिनेमाच्या एका इव्हेंटला हजेरी लावली होती. या इव्हेंटमधील तिचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. 

कल्की सिनेमाच्या इव्हेंटला दीपिका ग्लॅमरस लूकमध्ये पोहोचली होती. काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये सहा महिन्यांच्या गरोदर दीपिकाचा बेबी बंपही स्पष्ट दिसत होता. ग्लॅमरस लूक केलेल्या दीपिकाने ड्रेसवर हाय हिल्स घातले होते. गरोदर दीपिकाला हाय हिल्स घातलेले पाहून मात्र नेटकरी भडकले. वुम्पला या इन्स्टाग्राम पेजवरुन या इव्हेंटमधील दीपिकाचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत दीपिकाने हाय हिल्स घातलेले दिसत आहेत. या व्हिडिओवर कमेंट करत नेटकऱ्यांनी दीपिकाला खडे बोल सुनावले आहेत. 

"गरोदरपणात हाय हिल्स घालणं गरजेचं आहे का? उंची तर जास्तच आहे तुझी...हिल्सची गरजही नाही", "प्लीज हाय हिल्स घालू नकोस", "गरोदरपणात हाय हिल्स", "प्रेग्नंन्सी आणि हाय हिल्स...बॅड कॉम्बो" अशा कमेंट दीपिकाच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी केल्या आहेत. 

दीपिका आणि रणवीरने २०१८ साली लग्नबंधनात अडकून नव्या आयुष्याला सुरुवात केली होती. लग्नानंतर ६ वर्षांनी ते आईबाबा होणार आहेत. दीपिका सप्टेंबर महिन्यात पहिल्या बाळाला जन्म देणार आहे. आईबाबा होण्यासाठी दीपवीर उत्सुक आहेत.  

टॅग्स :दीपिका पादुकोणगर्भवती महिलासेलिब्रिटी