Join us

VIP दर्शन बंद! मग रिक्षाने गेली अन् गर्दीत..; प्रिती झिंटाने आईसह घेतलं काशी विश्वनाथाचं दर्शन, सांगितला अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 15:33 IST

प्रिती झिंटाने वाराणसीत काशी विश्वनाथाचं दर्शन घेण्यासाठी रिक्षाने प्रवास केला. याचा व्हिडिओ तिने शेअर केला आहे.

दीड महिन्यांपासून प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्याची २७ फेब्रुवारीला सांगता झाली. १४४ वर्षांनी पार पडलेल्या या महाकुंभ मेळ्यात लाखो भाविकांनी गंगास्नान करत डुबकी मारली. तर अनेक सेलिब्रिटीही या महाकुंभ मेळ्यात सहभागी झाले होते. बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटादेखील महाकुंभ मेळ्यात तिच्या आईसोबत गेली होती. प्रयागराज येथे गंगास्नान केल्यानंतर प्रीतीने वाराणसीतील काशी विश्वनाथाचं दर्शन घेतलं. याचा अनुभव तिने ट्विट करत शेअर केला आहे. 

प्रिती झिंटाने वाराणसीत काशी विश्वनाथाचं दर्शन घेण्यासाठी रिक्षाने प्रवास केला. याचा व्हिडिओ तिने शेअर केला आहे. 

प्रिती झिंटाने शेअर केला अनुभव

आईला महाकुभं ट्रिप महाशिवरात्रीला वाराणसीत संपवायची इच्छा होती. तिच्या इच्छेखातर मी तिला तिथे घेऊन गेले. प्रचंड गर्दी असल्याने कार जायला जागा नव्हती. रस्त्यांवर प्रचंड कोंडी असल्याने लोक पायी चालत जाऊनच काशी विश्वनाथ मंदिरात दर्शन घेत होते. मग आम्हीदेखील तसंच करण्याचा निर्णय घेतला. कारनंतर आम्ही ऑटो रिक्षामध्ये बसलो. नंतर सायकल रिक्षाने प्रवास केला. 

इतकी गर्दी असूनही मला निगेटिव्हिटी जाणवली नाही. लोक चांगले होते. या ट्रिपसाठी आम्हाला काही तास लागले. मात्र इच्छाशक्ती आणि श्रद्धा यामुळे हा वेळ कसा गेला हे कळलंच नाही. माझ्या आईला याआधी एवढं खूश मी कधीच पाहिलं नव्हतं. तिच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. तिच्याकडे पाहिल्यानंतर मला जाणवलं की पालकांची सेवा ही देवाच्या सेवेपेक्षाही उच्च आहे. पण, दुर्देवाने आपण पालक झाल्याशिवाय आपल्याला त्यांची किंमत कळत नाही. 

आम्ही तिथे मध्यरात्री पोहोचलो आणि आम्हाला आरतीही मिळाली. काही वेळासाठी VIP सर्व्हिस बंद करण्यात आल्या होत्या. पण, त्याने काहीच फरक पडला नाही.  

प्रिती झिंटाच्या या पोस्टवर चाहते कमेंट करत आहेत. अभिनेत्रीच्या साधेपणाचं चाहत्यांकडून कौतुक होत आहे. 

टॅग्स :प्रीती झिंटासेलिब्रिटी