शेकडो चित्रपटांत खलनायकाची भूमिका साकारणारे बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांचा आज वाढदिवस. आज प्रेम चोप्रा बॉलिवूडमध्ये सक्रिय नाहीत. पण 80 च्या दशकात प्रत्येक चित्रपटात त्यांची भूमिका ही ठरलेली असायची. 23 सप्टेंबर 1935 रोजी प्रेम चोप्रा यांचा जन्म झाला.आपल्या फिल्मी करिअरमध्ये प्रेम चोप्रा यांनी 300 वर चित्रपटांत काम केले. पण एका चित्रपटातील एक रेप सीन त्यांना कायम लक्षात राहील. होय, 80 दशकातील प्रत्येक चित्रपटात रेप सीन असायचाच असायचा. प्रेम चोप्रांच्या वाट्याला असाच एक सीन आला. खरे तर असे अनेक सीन त्यांनी त्यापूर्वी शूट केले होते. पण हा सीन शूट करताना त्यांच्या नाकीनऊ आले.
या सीनमध्ये प्रेम चोप्रा यांना मागून येऊन हिरोईनला घट्ट पकडायचे होते. प्रेम चोप्रा यांनी नेमके तेच केले. पण हिरोईनच्या चेहºयावरचे भाव दिग्दर्शकाला पसंत येईना. मग काय या सीनचे अनेक रीटेक झालेत. अनेक प्रयत्नांनंतर हा सीन शूट झाला. पण या सीनमध्ये असलेल्या हिरोईनने प्रेम चोप्रांची तक्रार केली.
प्रेम यांच्यामुळे माझ्या हाताला दुखापत झाल्याचे तिचे म्हणणे होते. अखेर दिग्दर्शकाने या हिरोईनला कसेबसे समजावले. काही दिवसानंतर याच हिरोईनसोबत प्रेम चोप्रांचा आणखी एक सीन होता. या सीनमध्ये हिरोईनला प्रेम यांच्या थोबाडीत मारायची होती.
त्या हिरोईनने नेमकी संधी साधली आणि प्रेम यांच्या इतक्या जोरात थोबाडीत मारली की, सगळेच स्तब्ध झालेत. हिरोईनने सूड घेतला, हे कळायला प्रेम चोप्रा यांना वेळ लागला नाही. प्रेम चोप्रा यांनी स्वत:च एका मुलाखतीत हा किस्सा सांगितला होता.