साउथचा स्टायलिश स्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि नॅशनल क्रश रश्मिका मंदाना(Rashmika Mandana)चा पुष्पा (Pushpa Movie) चित्रपट रिलीज होऊन बराच काळ उलटला तरीदेखील या चित्रपटाची क्रेझ अद्याप कमी झालेली नाही. या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची घोषणा करण्यात आली. त्यामुळे चाहते दुसऱ्या भागाबद्दल जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक आहेत. या चित्रपटातील ‘पुष्पा एंटे फ्लावर अनुकुंटिवा…फायर’ म्हणजेच पुष्पा नाम समझकर फ्लॉवर समझे क्या फायर है मैं है हा डायलॉग सुपरडुपर हिट झाला. यावर लाखो रील बनवल्या गेल्या आहेत. या तेलगू चित्रपटाचा नायक पुष्पाराजला हिंदीत आवाज श्रेयस तळपदे (Shreyas Talpade)ने दिला आहे. यासाठी श्रेयसचे खूप कौतुक झाले. हा डायलॉग लिहिला आहे श्रीकांत विसा यांनी. ब्लॉकबस्टर पुष्पा या चित्रपटासाठी संवाद लिहिणारे श्रीकांत विसा आता 'पुष्पा: द रुल' अधिक चांगला आणि अपेक्षेपेक्षा जास्त बनवण्यासाठी कोणतीही कसर ठेवणार नाही आहेत. त्यांनी चित्रपटाच्या दुसऱ्या भागाच्या संवादांवर कामदेखील सुरू केले आहे. अलीकडेच पिंकव्हिलाशी बोलताना त्यांनी बऱ्याच गोष्टींचे खुलासे केले. ते 'पुष्पा: द रुल' चित्रपटातून एक दर्जा वाढवण्याचा विचार करत आहेत.
पुष्पा 2 मध्ये असणार अनेक सिग्नेचर डायलॉग श्रीकांत विसासोबत सुकुमार म्हणाले, 'पुष्पा भाग २ मध्ये अल्लू अर्जुनसाठी असे सिग्नेचर डायलॉग्स आणण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. प्रयत्न नेहमीच असतो आणि अशा ओळी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. हे पुष्पा मध्ये काम केले आहे आणि त्याच्या भाग २ साठी आम्ही अपेक्षा करतो की तो मोठा आणि चांगला असेल. पुष्पा २ मध्ये तुम्हाला नक्कीच खूप आकर्षक लाइन ऐकायला मिळतील.