Join us

वैजयंतीमालांना पाहताच पंतप्रधान मोदींनी केलेल्या 'या' कृतीचं होतंय सगळीकडे कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2024 9:18 AM

वैजयंतीमाला आणि पंतप्रधान मोदी यांच्या भेटीची छायाचित्रं सोशल मीडियावर प्रसिद्ध झाली आहेत

 काहीच दिवसांपुर्वी अयोध्या राम मंदिर परिसरात ९० व्या वर्षी वैजयंतीमालांनी केलेल्या नृत्याची चांगलीच चर्चा रंगली. वैजयंतीमालांनी सुंदर भरतनाट्यम नृत्य करुन थक्क करणारा नृत्याविष्कार केला. अशातच पंतप्रधान मोदींनी वैजयंतीमालांची भेट घेतली आहे. वैजयंतीमालांची भेट घेऊन भारावून टाकणारा अनुभव मोदींनी शेअर केला. या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

वैजयंतीमालांच्या भेटीची छायाचित्रं शेअर करताना पीएम मोदींनी X वर लिहिले की, "चेन्नईत वैजयंतीमालाजी यांना भेटून आनंद झाला. त्यांना नुकतंच पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. याशिवाय त्यांनी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल संपूर्ण भारतीय सिनेसृष्टीत त्यांचं कौतुक होत आहे." अशा शब्दात पंतप्रधान मोदींनी वैजयंतीमालांचं कौतुक केलं.

पंतप्रधान मोदी अभिनेत्री वैजयंतीमालांना हात जोडून अभिवादन करताना पंतप्रधान मोदी दिसत होते. मोदींनी केलेल्या या आदरपुर्वक कृतीचं सगळीकडे कौतुक होतंय. काहीच दिवसांपुर्वी वैजयंतीमाला यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याआधी त्यांना 1968 मध्ये भारत सरकारने चौथा-सर्वोच्च नागरी सन्मान पद्मश्री देऊन सन्मानित केले होते. वयाच्या ९०  व्या वर्षी वैजयंतीमालांचं कलेप्रती असणारं प्रेम निश्चित कौतुकास्पद आहे.

टॅग्स :वैजयंती मालापी. एम. नरेंद्र मोदीनरेंद्र मोदी