सारा अली खानला डेब्यू करण्यापूर्वी मॉम अमृता सिंगने 'हि' गोष्ट न करण्यासाठी दिली तंबी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2018 5:07 AM
सैफ अली खान आणि अमृता सिंग यांची मुलगी सारा अली खान लवकरच 'केदारनाथ' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करते आहे. त्यामुळे ...
सैफ अली खान आणि अमृता सिंग यांची मुलगी सारा अली खान लवकरच 'केदारनाथ' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करते आहे. त्यामुळे साराची आई अमृता तिच्या डेब्यूला घेऊन तिला मार्गदर्शन करते आहे तसेच करिअरशी संबंधीत निर्णय घेण्यासाठी मदत देखील करते आहे. डेक्कन क्रॉनिकलमधल्या रिपोर्टनुसार, साराची आई आणि करण जोहरने साराला सांगितले आहे की, बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्याआधी कोणत्याच ब्रँड इंडोर्समेंट साइन करायच्या नाहीत. तुम्हाला सांगतो सध्या बॉलिवूडमध्ये डेब्यूच्या आधीच सारा अली खानची डिमांड आहे. अजून तिचा पहिला चित्रपट केदारनाथ रिलीजदेखील झाला नाही तर तिला रोहित शेट्टीने रणवीर सिंगच्या अपझोटि 'सिम्बा'साठी कास्ट केले आहे. खरे तर करणला या चित्रपटात साराचं हवी होती. पण पहिल्या वहिल्या ‘केदारनाथ’ या चित्रपटात व्यस्त असल्याने साराने करणच्या या चित्रपटाला नकार दिला होता. कारण त्यावेळी सारा केवळ ‘केदारनाथ’वर फोकस करू इच्छित होती. पण गेल्या काही दिवसांतचं ‘केदारनाथ’ रखडला आणि पुढे रखडतचं गेला. कदाचित यामुळे संधीचे सोने करण्याच्या इराद्याने साराने करणला होकार देणेचं योग्य समजले. ALSO READ : It's final: अखेर रणवीर सिंगला मिळाली हिरोईन! ‘सिम्बा’मध्ये सारा अली खानची वर्णी!!सारा अली खान सुशांत सिंग राजपूतच्या अपोझिट केदारनाथ चित्रपटात झळकणार आहे. हा चित्रपट २०१३ मध्ये ‘केदारनाथ’मध्ये आलेल्या प्रलयाच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. अभिषेक कपूर या चित्रपटाचे दिग्दर्शन करतो आहे. चित्रपटात सारा एक साधी आणि गर्ल नेट डोरच्या इमेजमध्ये दिसणार आहे. वास्तविक सारा खूपच स्टायलिश आणि ट्रेण्ड फॉलो करणारी मुलगी आहे; मात्र या चित्रपटात तिची भूमिका तिच्या पर्सनॅलिटीशी अगदीच विभिन्न प्रकारची आहे. तर सुशांत सिंग राजपूत पिठ्ठूची भूमिका साकारणार आहे. हा दोघांची लव्हस्टोरी या चित्रपटात बघायला मिळणार आहे. दोघांची केमिस्ट्री पाहण्यासाठी प्रेक्षक नक्कीच आतुर असतील यात काही शंका नाही. सारा एका श्रीमांत घरातील मुलगी असते आणि पिठ्ठू तिच्या प्रेमात पडतो. 'केदारनाथ’ हा चित्रपट एक पॅशनेट लव्ह स्टोरी आहे.