प्रिया प्रकाश वारियरचा ‘नैन मटक्का’ पुन्हा वादात, गाण्याविरोधात नवी तक्रार!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2018 7:32 AM
प्रिया प्रकाश वारियर ही मल्याळम अभिनेत्री काही सेकंदाच्या क्लिपने एका रात्रीत स्टार झाली. या क्लिपमधील तिच्या अदांनी अख्ख्या जगाला वेड लावले. पण याच अदा प्रियासाठी डोकेदुखी ठरण्याची चिन्हे आहेत.
प्रिया प्रकाश वारियर ही मल्याळम अभिनेत्री काही सेकंदाच्या क्लिपने एका रात्रीत स्टार झाली. या क्लिपमधील तिच्या अदांनी अख्ख्या जगाला वेड लावले. पण याच अदा प्रियासाठी डोकेदुखी ठरण्याची चिन्हे आहेत. होय,‘ओरू अडार लव’या चित्रपटातील ‘मानिका मलयारा पूवी’ या गाण्याच्या एका क्लिपने प्रिया प्रकाशला एका रात्रीत स्टार बनवले. ही क्लिप इतक्या वेगाने व्हायरल झाली की, एकाच दिवसांत प्रियाच्या इन्स्टाग्राम फॉलोवर्सची संख्या सहा लाखांवर पोहोचली. या फॅन फॉलोविंगने प्रियाला जगातील तिसरी पॉप्युलर इन्स्टा सिलेब्स बनवले. या व्हिडिओत प्रिया प्रकाश ‘आंखों ही आंखों में’रोमान्स करताना दिसली होती. तिच्या या ‘आंखों ही आंखों में’ रोमान्सविरोधात सर्वोच्च न्यायालयात नवी याचिका दाखल करण्यात आली आहे. यात प्रिया नजरेतून प्रेमाचे बाण डागतांना दिसतेय. हा सीन इस्लामविरोधी असल्याचे सांगत हैदराबादेतील दोन पक्षांनी ही याचिका दाखल केली आहे. डोळा मारणे हे इस्लाममध्ये ‘हराम’ आहे आणि संबंधित गाण्यात प्रिया प्रकाशने नेमके हेच केले आहे. हे दृश्य मुस्लिमांच्या भावना दुखावणारे असल्याचे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. ALSO READ : व्हायरल गर्ल प्रिया प्रकाशचा आणखी एक व्हिडीओ होतोय व्हायरल, सिम्पल अदांनी चाहते घायाळ!प्रिया प्रकाशच्या या गाण्याविरोधात यापूर्वीही तक्रार दाखल करण्यात आली आहे. गत फेबु्रवारीत महाराष्ट्रातील एका स्थानिक संघटनेने मुस्लिमांच्या भावना दुखावल्याचा आरोप करत, या गाण्यावर आक्षेप घेतला होता. शिवाय चित्रपटाच्या दिग्दर्शकाविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. प्रिया ही केरळच्या त्रिशूरची राहणारी आहे. डान्स आणि भटकंती हे तिचे आवडते छंद आहेत. बी कॉम फर्स्ट ईअरची विद्याथीर्नी असलेली प्रिया सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह आहे. ‘ओरू अडार लव’ या चित्रपटात प्रिया एका किशोरवयीन मुलीच्या भूमिकेत आहे. किशोरवयात मनात फुलू लागलेल्या प्रेमाची कथा यात आहे. हा प्रियाचा डेब्यू सिनेमा आहे.