Join us

प्रियंका चोपडाने घेतली मुजून अलमेल्लेहानची भेट! म्हटले, जगात शांतता हवी असेल तर गांधीजींचा मार्ग अवलंबवा!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2017 1:34 PM

देसी गर्ल प्रियंका चोपडा सध्या न्यूयॉर्क येथील यूएन ग्लोबल गोल्स अवॉर्ड्समध्ये सहभागी होण्यासाठी पोहोचली आहे. यावेळी प्रियंकाने गर्ल्स इम्पॉवरमेंटवर ...

देसी गर्ल प्रियंका चोपडा सध्या न्यूयॉर्क येथील यूएन ग्लोबल गोल्स अवॉर्ड्समध्ये सहभागी होण्यासाठी पोहोचली आहे. यावेळी प्रियंकाने गर्ल्स इम्पॉवरमेंटवर तिचे मत मांडले. शिवाय यावेळी तिने यूएनची सर्वात तरुण सद्भावनादूत सिरीयाई मुजून अलमेल्लेहान हिची भेटही घेतली. मुजूनसोबतची भेटीचा एक फोटोही प्रियंकाने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. शिवाय याबरोबर एक लांबलचक लेखही लिहिला आहे. प्रियंकाने लिहिले की, ‘महात्मा गांधींच्या शब्दांमध्ये सांगायचे झाल्यास, जर आपल्याला या जगात शांती प्रस्थापित करायची असेल आणि युद्धाच्या विरोधात खºया अर्थाने युद्ध छेडायचे असेल तर त्याची सुुरुवात आपल्याला लहान मुलांपासून करावी लागेल. पुढे प्रियंकाने लिहिले की, ‘यूएन ग्लोबल गोल्स अवॉडर््समध्ये गर्ल इम्पॉवरमेंटवर बोलणे माझ्यासाठी सन्मानजनक होते. आपल्याला सगळ्यांना एकत्र येऊन मुलींसाठी इम्पॉवर, एज्युकेट आणि त्यासाठी संधी उपलब्ध करून देण्याची गरज आहे. जर शक्य होत असेल तर आपल्याला अशा एका सामाजाची निर्मिती करायची आहे, ज्याठिकाणी लोकांना त्यांचे हसत-हसत स्वप्न पूर्ण करता यावे. सर्वात तरुण सद्भावनादूत असलेली मुजून अलमेल्लेहान सीरियातील शरणार्थी आणि शिक्षण प्रसार कार्यकर्ती आहे. मुजूनने म्हटले होते की, ‘शरणार्थी असताना मी बघितले की, मुलींना लहान वयातच विवाहाच्या बंधनात बांधले जात आहे. तसेच त्यांना बालकामगार बनविले जात आहे. यूनिसेफबरोबर काम करताना मी अशा मुलांना शाळेत दाखल करून त्यांची मदत करू इच्छिते. याचवर्षी झालेल्या ६९ व्या एॅमी अवॉडर््समध्ये ग्लोबल स्टार प्रियंका चोपडाने अनेकांचे लक्ष तिच्याकडे आकर्षित केले होते. तिच्या ड्रेसमुळे ती त्यावेळी चांगलीच चर्चेत आली होती. त्यावेळी तिचे लोकांनी खूप कौतुकही केले होते. बºयाचशा लोकांना असे वाटत असते की, बेस्ट ड्रेस परिधान करणे सोपे काम नाही. प्रियंकाचा गाऊन बघून तर ही बाब निश्चित झाली होती. असो, सध्या प्रियंका हॉलिवूडमध्ये काही प्रोजेक्टवर काम करीत असून, लवकरच ती बॉलिवूडमधील काही चित्रपट साइन करणार आहे.