'जोनास ब्रदर्स'ची (Jonas Brothers) म्युझिक कॉन्सर्ट असेल आणि प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) जाणार नाही असं तर शक्यच नाही. पती निक जोनासला (Nick Jonas) सपोर्ट करायला प्रियंका नेहमी हजर असते. नुकतंच जोनास ब्रदर्सची लाईव्ह कॉन्सर्ट आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रियंका चोप्रा आणि कॉन्सर्टमध्ये आलेल्या एका चाहतीचं संभाषण सोशल मीडियावर व्हायरल होतंय. मला निकशी लग्न करायचं होतं असं ती चाहती म्हणाली. यावर प्रियंकाने दिलेलं उत्तरही मजेशीर आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओत प्रियंका पतीची म्युझिक कॉन्सर्ट एन्जॉय करताना दिसत आहे. यावेळी एक चाहती प्रियंका जवळ येते आणि म्हणते, 'मला खरंच असं वाटलं होतं की मी निकशी लग्न करेन. पण मला आनंद आहे की तू त्याच्याशी लग्न केलंस.' यावर प्रियंकाचा रिप्लाय फारच मजेशीर आहे. ती म्हणते,'मलाही आनंद आहे की मी असं केलं'. तर ती चाहती म्हणते, 'मला फार इर्ष्या वाटते'.
प्रियंका आणि चाहतीमध्ये झालेलं हे संभाषण अगदीच मजेशीर आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. एकीकडे निक आणि प्रियंका कपल गोल्स देत आहेत तर दुसरीकडे निकचा भाऊ जो जोनास घटस्फोट घेण्याच्या तयारित आहे. सध्या जोनास कुटुंब काही ना काही कारणाने प्रसिद्धीझोतात आलं आहे.