प्रियांका चोप्रा व निक जोनासच्या बोटांत दिसली ‘सेम टू सेम’ रिंग!!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2018 10:26 AM2018-06-27T10:26:42+5:302018-06-27T10:26:42+5:30

 प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन सिंगर निक जोनास यांच्या कथित अफेअरबद्दल रोज नवे अपडेट्स येत आहेत. आधी प्रियांकासाठी निकने भारतात ...

Priyanka Chopra and Nick Jonas' fingers-to-beam ring! | प्रियांका चोप्रा व निक जोनासच्या बोटांत दिसली ‘सेम टू सेम’ रिंग!!

प्रियांका चोप्रा व निक जोनासच्या बोटांत दिसली ‘सेम टू सेम’ रिंग!!

googlenewsNext
 
्रियांका चोप्रा आणि अमेरिकन सिंगर निक जोनास यांच्या कथित अफेअरबद्दल रोज नवे अपडेट्स येत आहेत. आधी प्रियांकासाठी निकने भारतात येणे, मग प्रियांकाच्या कुटुंबाला भेटणे, त्यांच्यासोबत डिनर डेटवर जाणे आणि यानंतर गोव्यात हॉलिडे एन्जॉय करणे हे सगळे बरेच काही सांगणारे आहे. आता या दोघांच्या अगदी एकसारख्या अंगठीकडेही मीडियाच्या नजरा वळल्या आहेत.



होय, निक व प्रियांकाच्या बोटात अगदी सेम टू सेम रिंग दिसली. सध्या याचीच चर्चा आहे. या रिंगवरून प्रियांका व निकने सीक्रेट एन्गेज्डमेंट तर केली नाही ना, अशी शंका चाहत्यांच्या मनात येत आहे. पण ही शंका जोर धरण्याआधी आम्ही एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो, ती म्हणजे असे काहीही नाहीये. 





अद्याप प्रियांका व निक यांचा साखरपुडा झालेला नाही. कारण प्रियांकाने ही रिंग आपल्या रिंग फिंगरमध्ये घातली आहे आणि निकने आपल्या मिडल फिंगरमध्ये. साखरपुडा झाला असता तर दोघांच्याही रिंग एकाच रिंग फिंगरमध्ये असत्या. कालचं बातमी होती की, निक व प्रियांका येत्या जुलै व आॅगस्टमध्ये साखरपुडा करू शकतात. 
 भारतातचं हा साखरपुडा होईल, असेही समजतेय. आता या बातमीत किती तथ्य आहे, किती नाही हे लवकरचं कळेल. तोपर्यंत प्रियांका व निकच्या फुलत्या प्रेमाकडे आमचे लक्ष असेलच.
 

Web Title: Priyanka Chopra and Nick Jonas' fingers-to-beam ring!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.