बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि अमेरिकन सिंगर निक जोनास यांनी गतवर्षी लग्नगाठ बांधली. जोधपूरच्या उमेद भवन येथे 1 व 2 डिसेंबरला हा रॉयल विवाह सोहळा पार पडला होता. हिंदू आणि ख्रिश्चन अशा दोन्ही पद्धतीने हा विवाह सोहळा पार पडला होता. हे लग्न इतके रॉयल होते की, या एकाच लग्नातून उमेद भवन हॉटेलची तीन महिन्यांची कमाई झाली. होय, इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुनीत चटवाल यांनी स्वत: ही माहिती दिली.
त्यांनी सांगितले, प्रियंका व निकच्या लग्नासाठी संपूर्ण उमेद भवन चार दिवसांसाठी बुक केले गेले होते. यादरम्यान बाहेरच्या व्यक्तिस हॉटेलमध्ये प्रवेश बंदी होती. या चार दिवसांत प्रियंका व निक यांनी तीन कोटी रूपयांपेक्षा अधिक खर्च केला. या एकाच लग्नातून आम्ही तीन महिन्यांची कमाई वसूल केली. आमचे तीन महिने आरामात निघाले.
प्रियंका व निकचे लग्न 2018 मधील सर्वाधिक चर्चित लग्न होते. म्हणूनच या दोघांच्या संगीत सेरेमनीवर आता एक वेबसीरिज बनतेय. ही सीरिज अॅमेझॉन प्राईमवर रिलीज केली जाईल. एक सेलिब्रिटी आपल्या लग्नाचे खासगी क्षण सीरिजरूपात प्रेक्षकांसमोर घेऊन येण्याची ही पहिली वेळ असेल.
2020 मध्ये ही सीरिज रिलीज होणार आहे. खुद्द प्रियंकाने अलीकडे ही माहिती जाहीर केली होती. ‘आमच्या लग्नाच्या संगीत सेरेमनीमध्ये दोन्ही कुटुंबांनी परफॉर्म केला होता. त्यातून आमची प्रेम कहाणी दर्शवण्यात आली होती.