हे वर्ष बॉलिवूडसाठी ठरले असे म्हटले ते वावगे ठरणार नाही. आधी सोनम कपूर मग नेहा धुपिया आणि आता रणवीर-दीपिका पादुकोण. आता नंबर आहे तो देसी गर्ल प्रियांका चोप्रा. आता प्रियांका- निक जोनसच्या लग्नाची तयारी जोरात आहे. जोधपूरच्या उम्मेद भव पॅलेसमध्ये प्रियांका निकसोबत सात फेरे घेणार आहे.
सूत्रांच्या माहितीनुसा 28 नोव्हेंबर ते 3 डिसेंबरपर्यंत लग्नाच्या विधी चालणार आहेत. निक या आठवड्यात कुटुंबीयांसोबत भारतात येणार आहे. प्रियांका सध्या 'द स्काई इज पिंक' सिनेमाचे शूटिंग पूर्ण करतेय. 28 नोव्हेंबरला ती निकसोबत जोधपूरला रवाना होणार आहे.
मीडिया रिपोर्टनुसार दोघे हिंदू आणि ख्रिश्चन पद्धतीने लग्न करणार आहेत. 2 डिसेंबरला हिंदू विधीप्रमाणे लग्न होईल तर 3 डिसेंबरला ख्रिश्चन पद्धतीने. दोनही लग्न उम्मेद भवनातच होणार आहेत. निकने संगीत सेरेमनीसाठी खास प्लान तयार केला आहे. येत्या ३० नोव्हेंबरला हा संगीतसोहळा होणार आहे. या संगीत सेरेमनीत निक आणि पीसी दोघेही परफॉर्म करणार आहे. निक तर खास आपल्या ट्रूपसोबत परफॉर्म करणार आहे. त्याचा हा परफॉर्मन्स ४५ मिनिटांचा असेल. संगीत सेरेमनीसाठी कोरियोग्राफरला बोलवण्यात आले असून गणेश हेगडे डान्स बसवणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निक या कार्यक्रमात देसी गर्ल या गाण्यावर थिरकणार आहे. या गाण्यावर गणेश त्याला डान्स शिकवणार आहे.
निक आणि प्रियांका दोघेही प्रचंड प्रसिद्ध असल्याने त्यांच्या लग्नाची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो एका इंटरनॅशनल पब्लिकेशनला त्यांनी १८ कोटीला विकले.