Join us  

Parineeti-Raghav: बहिणी परिणीतीच्या साखरपुड्यासाठी दिल्लीला पोहोचली प्रियंका चोप्रा, एअरपोर्टवर दिसली कॅज्युअल लूकमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2023 11:35 AM

बहीण परिणीती चोप्राच्या एंगेजमेंटसाठी प्रियंका चोप्रा लंडनहून आली आहे.

प्रियंका चोप्राची चुलत बहीण आणि बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आपल्या नव्या आयुष्याला सुरुवात करणार आहे. आज 13 मे रोजी दिल्लीतील कपूरथला हाऊसमध्ये रात्री 8 वाजता परिणीती आणि राघव चड्ढा यांचा साखरपुडा होणार आहे. यामध्ये चित्रपटसृष्टीसोबतच राजकीय पक्षांशी संबंधित सुमारे दीडशे लोकांना निमंत्रण देण्यात आले आहे. यासोबतच तिची बहीण प्रियंका चोप्राही दिल्लीत पोहोचली आहे. तिला विमानतळावर स्पॉट करण्यात आले आहे

गेल्या काही महिन्यांपासून परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांना दिल्ली आणि मुंबईत एकत्र स्पॉट केले गेलं. कधी लंच डेटला भेटतो तर कधी डिनर डेटला..तर, IPL सामन्यावेळी क्रिकेटच्या मैदानतही त्यांचा जल्लोष पाहायला मिळाला. दोघांनी हे नातं कधीच अधिकृतरित्या स्वीकारले नाही. मात्र आज ते 13 मे रोजी एंगेजमेंट करणार आहेत. तर, याचवर्षी म्हणजे ऑक्टोबरमध्ये ते लग्नबंधनात अडकणार आहेत.

बहीण परिणीती चोप्राच्या एंगेजमेंटसाठी प्रियंका चोप्रा लंडनहून आली आहे. प्रियंका चोप्रा यावेळी एकटीच स्पॉट झाली तिच्यासोबत निकजोनास मात्र मेहुणीच्या साखरपुड्याला आलेला नाही. एअरपोर्टवरुन बाहेर पडताच प्रियंका कारमध्ये बसली. यादरम्यान तिच्यासोबत मुलगी मालती मेरीही दिसली नाही. ती एकटीच परिणीतीच्या साखरपुड्यात सहभागी होणार आहे.    

दरम्यान, आपल्या बहिणीच्या लग्नासाठी प्रियंका चोप्रा आणि तिचा नवरा निक जोनस हेही ऑक्टोबरमध्ये लग्नाला उपस्थित राहू शकतात. कारण, त्याचवेळी Jio MAMI फिल्म फेस्टिव्हलसाठी दोघेही भारतात येत आहेत. राघव आणि परिणिती या दोघांनीही लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये एकत्र शिक्षण घेतलं आहे आणि त्यांचे अनेक कॉमन फ्रेन्ड्स आहेत. 

टॅग्स :प्रियंका चोप्रापरिणीती चोप्रा