Join us

प्रियंका चोप्रानं होणाऱ्या वहिणीची अगदी धाकट्या बहिणीप्रमाणे घेतली काळजी, पाहा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 12:12 IST

प्रियंकाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला.

Priyanka Chopra: अभिनेत्री प्रियंका चोप्राचा (Priyanka Chopra) च्या घरी लगीनघाई सुरू आहे. तिचा भाऊ सिद्धार्थ चोप्रा हा त्याची गर्लफ्रेंड नीलम उपाध्यायशी लग्न करणार आहे.  लाडक्या भावाच्या लग्नासाठी देसी गर्ल प्रियांका पती निक जोनास व लेक मालतीबरोबर भारतात आली आहे. सिद्धार्थच्या मेहंदी समारंभ, हळदी व संगीत समारंभातील फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अशातच प्रियंकाचा एक व्हिडीओ समोर आला आहे.

सिद्धार्थ आणि निलमच्या संगीत सोहळ्यासाठी प्रियंकानं निळ्या रंगाचा लेहेंगा परिधान केला होता. या लेहेंग्यात ती अगदी सुंदर दिसत होती. नीलम, सिद्धार्थ, प्रियांका व निक यांनी एकत्र पापाराझींना फोटोसाठी पोज  दिल्या. यावेळी प्रियंका ही होणारी वहिनी नीलमचा लाँग टेल ड्रेस नीट करताना दिसून आली. अगदी धाकट्या बहिणीप्रमाणे निलमची काळजी घेतल्यानं प्रियंकाचे चाहते तिचं कौतुक करत आहेत. प्रियंकाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला.

प्रियंकाचा धाकटा भाऊ सिद्धार्थ आणि नीलम यांचं आज ७ फेब्रुवारी रोजी लग्न मुंबईत होणार आहे. प्रियंकाच्या अलिकडच्या कामाबद्दल बोलायच झालं तर, प्रियंका एसएस राजामौली यांच्या 'एसएसएमबी २९' या चित्रपटात महेश बाबूसोबत काम करणार असल्याची चर्चा आहे. तथापि, अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. प्रियxकाने 'अनुजा' या लघुपटाची निर्मिती केली होती, जी ऑस्करसाठी नामांकित झाली होती. 

टॅग्स :प्रियंका चोप्रा