प्रियांका चोप्राच्या फॅन्सचे लक्ष गेल्या अनेक महिन्यांपासून या दिवसाकडे लागले होते. प्रियांका चोप्रा आता मिसेस जोनास झाली आहे. प्रियांका आणि निकचा ख्रिश्चन पद्धतीने विवाह झाला आहे. जोधपूरच्या उम्मेद भवनमध्ये हा विवाह सोहळा पार पडला.
ख्रिश्चन पद्धतीने झालेल्या विवाह सोहळ्यात जेवण तयार करण्यासाठी प्रियांकाने खास एक टीम गोव्याहुन आणली आहे. दीपिका आणि रणवीर प्रमाणे विवाहातील फोटो बाहेर लीक होऊन नये याची पूरेपूर काळजी प्रियांकाने घेतली. निक आणि प्रियांका त्यांच्या लग्नाचे फोटो एका इंटरनॅशनल पब्लिकेशनला त्यांनी १८ कोटीला विकले गेले असल्याचेही कळतेय.
उद्या प्रियांका हिंदू रिती-रिवाजा प्रमाणे लग्न करणार आहे. लग्नाचा मंडप जवळपास 40 फूटांचा असल्याची माहिती आहे.सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंदू पद्धतीनुसार होणाऱ्या लग्नात प्रियांका चोप्रा अबू जानी आणि संदीप खोसला किंवा सब्यसाची मुखर्जी यांनी डिझाईन केलेल्या लाल रंगाच्या आऊटफिटमध्ये दिसणार आहे.
गत शुक्रवार पासून या मेहंदी आणि संगीत सेरेमनी सुरुवात झाली होती. या संगीतसोहळयादरम्यान हिंदी बॉलिवूड आणि हॉलिवूड गाणी सादर झाली. विशेषत्वाने हिंदी चित्रपटसृष्टीतील ७० आणि ८० च्या दशकांतील सुंदर गाण्यांवर यावेळी नृत्य सादर झाले. ‘ये शाम मस्तानी’,‘तुम मिले दिल खिले’, ‘मेरे लिए मेरे लिए’,‘दिल की कसम’ या गाण्यांनी शुक्रवारी सोहळयाची रंगत आणली. तसेच इंग्रजी गाणे टायटॅनिकचे थीम साँगही सादर झाले.