बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंतचा अधिराज्य गाजवणारी प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra ) हिचा आज वाढदिवस. प्रियंका आज तिचा 39 वा वाढदिवस साजरा करतेय. 18 जुलै 1982 रोजी जमशेदपूर, बिहार (सध्या झारखंडमध्ये) जन्मलेल्या प्रियंकाची आज वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. बॉलिवूडची सर्वाधिक महागड्या अभिनेत्रींपैकी ती एक आहे. 2003 साली ‘द हिरो- लव्ह स्टोरी ऑफ स्पाय’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी प्रियंका आज कोट्यवधी रूपयांच्या संपत्तीची मालकीन आहे आणि अगदी रॉयल आयुष्य जगते. आज तिच्या संपत्तीबद्दल आपण जाणून घेणार आहोत. (Priyanka Chopra Net Worth)
caknowledge.comच्या रिपोर्टनुसार, 2021 मध्ये प्रियंकाच नेट वर्थ 30 मिलियन डॉलर म्हणजेच 225 कोटी रूपये आहे. तिची व तिचा पती निक जोनास यांची संपत्ती एकत्र केली तर या कपलकडे 734 कोटी रूपयांची संपत्ती आहे.प्रियंका महिन्याला दीड कोटींपेक्षा अधिक कमावते आणि वर्षाची तिची कमाई 18 कोटींपेक्षा अधिक आहे. मुंबईत जुहू भागात प्रियंकाचे अलिशान घर आहे. या घराची किंमत 100 कोटींच्या घरात आहे. अमेरिकेतही तिचा अलिशान बंगला आहे. गोव्यातही तिचा मोठा बंगला आहे.
प्रियंका लॅक्झरी गाड्यांची शौकीन आहे. ती बॉलिवूडची पहिली अभिनेत्री आहे, जिच्याकडे रॉल्स रॉयल्स लक्झरी कार आहे. या कारची किंमत 2.5 कोटी रूपये आहे. या शिवाय प्रियंका Mercedes Benz S class या गाडीतून फिरते. याची किंमतही 1 कोटींपेक्षा अधिक आहे. Porsche, Mercedes Benz E class and BMW अशा अनेक गाड्या तिच्याकडे आहेत.
प्रियंका एका सिनेमासाठी जवळपास 12 कोटी रूपये घेते आणि जाहिरातीसाठी सुमारे 2 ते 3 कोटी रूपये घेते. स्टेज परफॉर्मन्ससाठी प्रियंका 4 ते 5 कोटी रूपये घेते. इन्स्टाग्रामवर कमर्शिअल पोस्ट शेअर करण्यासाठी ती 2 कोटी रूपये घेते. प्रियंकाचे स्वत:चे पर्पल पेबल पिक्चर्स नावाचे प्रॉडक्शन हाऊस आहे.