एकीकडे प्रियंका चोप्रा लग्नानंतर आपल्या पर्सनल व प्रोफेशनल लाईफमध्ये आनंदी आहे. दुारीकडे पीसीचा भाऊ सिद्धार्थ चोप्रा याच्या आयुष्यात मात्र फार काही ठीक नसलेले दिसतेय. सिद्धार्थचा साखरपुडा एकदा नाही तर दोनदा मोडला. मात्र आता सिद्धार्थने तिस-यांदा साखरपुडा केल्याची चर्चा आहे. होय, सिद्धार्थने साऊथ अभिनेत्री नीलम उपाध्यायसोबत साखरपुडा केल्याची चर्चा रंगतेय.
अलीकडे सिद्धार्थ व नीलम एका इव्हेंटमध्ये एकत्र दिसले. सिद्धार्थची आई मधु चोप्रा या सुद्धा या इव्हेंटला हजर होत्या. यावेळी नीलमच्या बोटातील अंगठीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यानंतर सिद्धार्थ व नीलमने साखरपुडा केल्याचा अंदाज बांधला गेला.खरे काय हे अद्याप कुणालाही ठाऊक नाही. नीलमने मात्र या सगळ्या अफवा असल्याचे म्हटले आहे. माझा कोणासोबतही साखरपुडा झालेला नाही. सिद्धार्थ माझा चांगला मित्र आहे. पण काही लोकांना नको त्या चर्चा करायची सवय असते,असे नीलमने स्पष्ट केले.
यापूर्वी दोनदा सिद्धार्थचा साखरपुडा झाला होता. 2014 मध्ये त्याने कनिका माथुरसोबत साखरपुडा केला होता. 2015 मध्ये दोघेही लग्न करणार होते. मात्र साखरपुड्याच्या महिनाभर आधी दोघांचेही लग्न मोडले. यानंतर पाच वर्षांनी म्हणजे 2019 मध्ये सिद्धार्थने इशिता कुमारसोबत साखरपुडा केला.
साखरपुड्यानंतर लग्नाची तयारी सुरु असतानाच ऐनवेळी इशिताच्या सर्जरीमुळे हे लग्न पुढे ढकण्यात आल्याची बातमी आली होती. यानंतर अचानक प्रियंकाने आपल्या होणा-या वहिणीला म्हणजे इशिताला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केले. इशितानेही आपल्या सोशल अकाऊंटवरचे सिद्धार्थसोबतचे सगळे फोटो डिलीट केलेत आणि पुढे हे लग्न तुटल्याची बातमी आली. प्रियंका व सिद्धार्थची आई मधु चोप्रा यांनीही या वृत्ताला दिला होता. लग्नाबद्दल घाई करणे योग्य नाही, असे त्या म्हणाल्या होत्या.