प्रियांका चोप्राने बॉलिवूडमध्ये पूर्ण केलीत १६ वर्षे; चाहत्यांनी अशा दिल्या शुभेच्छा!!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2018 6:50 AM
ग्लोबल सेन्सेशन प्रियांका चोप्रा हिच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. होय, प्रियांकाने हिंदी सिनेसृष्टीत १६ वर्षे पूर्ण केली आहेत. ...
ग्लोबल सेन्सेशन प्रियांका चोप्रा हिच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. होय, प्रियांकाने हिंदी सिनेसृष्टीत १६ वर्षे पूर्ण केली आहेत. या खास प्रसंगी प्रियांकावर शुभेच्छांचा पाऊस पडतोय. चाहत्यांनी सोशल मीडियावर तिचे अभिनंदन केले आहे. सन २००२ मध्ये सनी देओलच्या ‘द हिरो : लव्ह स्टोरी आॅफ ए स्पाय’ या चित्रपटातून प्रियांकाने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले होते. यानंतरच्या १६ वर्षांत प्रियांकाने अनेक चित्रपट केलेत. एका पाठोपाठ एक हिट चित्रपट देत बॉलिवूडमध्ये भक्कम पाय रोवून उभी राहिली.आज आपल्या बॉलिवूडच्या १६ वर्षांच्या प्रवासाबद्दल लिहितानां, ‘ही वेळ आहे, अनेक भूमिका पुन्हा जगण्याची...’ असे प्रियांकाने लिहिले. शिवाय मला पहिल्यांदा पडद्यावर बघितले, त्यावेळची प्रतिक्रिया सांगा..., असे आवाहनही तिने चाहत्यांना केले. तिच्या या आवाहनानंतर चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्यात. चाहत्यांनी केवळ प्रियांकाला अभिनंदनाचे संदेश पाठवले नाही तर तिने जगलेल्या अनेक भूमिकांचे व्हिडिओही पाठवले. ‘बाजीराव मस्तानी हा पहिला हिंदी चित्रपट मी पाहिला आणि तुझ्या भूमिकेने मला प्रभावित केले,’ असे एका युजरने लिहिले. अन्य एका युजरने प्रियांकाने ‘डॉन’मध्ये साकारलेल्या भूमिकेचे कौतुक केले. ‘डॉनमध्ये तुला पाहिले आणि तुझ्या प्रेमात पडलो,’ असे या युजरने लिहिले. ALSO READ : प्रियांका चोप्राच नव्हे तर ‘हे’ कलाकारही ठरले वर्णभेदाचे बळी! सन २००२ मध्ये तामिळ चित्रपट ‘थमिजहन’मधून अभिनयाची सुरुवात केली. यानंतर सनी देओलच्या ‘द हिरो- लव स्टोरी आॅफ ए स्पाय’मधून तिने बॉलिवूड डेब्यू केला. सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार आणि चार श्रेणीत फिल्मफेअर पुरस्कार मिळवाणा-या प्रियांकाने अभिनयाच्या आपल्या १६ वर्षांच्या कारकिर्दीत हॉलिवूडपर्यंत मजल मारली. २००४ मध्ये ‘ऐतराज’मधील निगेटीव्ह रोलने प्रियांकाला खरी ओळख दिली. ‘डॉन’,‘कृष’ या चित्रपटानंतर ती बॉलिवूडच्या ए लिस्टमध्ये सामील झाली. आता तर ती ग्लोबल सेलिब्रिटी म्हणून ओळखली जातेय. गेल्या तीन वर्षांत हॉलिवूडमध्ये प्रियांकाने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. केवळ अभिनयातचं नाही तर एक यशस्वी गायिका आणि एक यशस्वी निर्माती अशीही तिची आज ओळख आहे.