मुंबई : गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि निक जोनस यांच्या साखरपुड्याची चांगलीच चर्चा रंगली आहे. पण प्रियंकाने ही बाब अनेकांपासून लपवली. मात्र आता प्रियंकाला तिचा साखरपुडा झाल्याची घोषणा करायची आहे असे वाटते आहे. कारण एक फोटो समोर आला असून त्यात प्रियंका रिंग दिसते आहे.
मनीष मल्होत्राने नुकतीच एक पार्टी दिली होती. यात अनेक बॉलिवूड कलाकारांसोबतच प्रियंका चोप्राही आली होती. अभिनेत्री रविना टंडनही इथे आली होती आणि तिने पार्टीतील काही फोटो सोशल मीडियात शेअऱ केले आहेत. त्यात एका फोटोत प्रियंका आणि रविना आहेत. या फोटोत प्रियंका स्पष्टपणे आपली रिंग दाखवताना दिसते आहे.
काही दिवसांपूर्वी प्रियंका तिची रिंग लपवताना दिसली होती. दिल्ली एअरपोर्टवर ती रिंग लवतानाचा व्हिडीओही व्हायरल झाला होता. पण आता यात ती स्पष्ट दिसते आहे. म्हणजे तिचा साखरपुडा झालाय हे स्पष्ट झालंय. पण आता अधिकृतरित्या प्रियंका कधी तिच्या साखरपुड्याची घोषणा करणार हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.