Join us  

प्रियांका चोप्रा करणार आता 'हे' काम!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2018 8:10 AM

प्रियांका चोप्रा बॉलिवूडमध्ये कमबॅक करतेय हे आपल्या सगळ्यांच माहिती आहे. मध्यतंरी प्रियांकाने गुपचुप लग्न केल्याच्या चर्चामुळे ती प्रकाश झोतात ...

प्रियांका चोप्रा बॉलिवूडमध्ये कमबॅक करतेय हे आपल्या सगळ्यांच माहिती आहे. मध्यतंरी प्रियांकाने गुपचुप लग्न केल्याच्या चर्चामुळे ती प्रकाश झोतात आली होती. मात्र यावेळी कारण थोडसे वेगळे आहे. प्रियांका आता एक काम करताना दिसणार आहे.  होय, तुम्ही बरोबर वाचवात प्रियांका लवकरच ट्रॅव्हल शो सुरु करणारे आहे. हा ट्रॅव्हल शो प्रियांका युट्यूबवर सुरु करणार आहे. 'इफ आय कूड टेल यू जस्ट वन थिंग' असं या प्रियांकाच्या नव्या शोचं नाव असणार आहे. या शोच्या माध्यमातून प्रियांका जगभर फिरणार आहे आणि तिथल्या राजकीय नेते, आध्यात्मिक गुरू आणि लेखक अशा विविध क्षेत्रातील लोकांशी संवाद साधणार आहे. जगात कसा बदल करता येईल या विषयावर ती या सर्व लोकांशी चर्चा करणार आहे.  ALSO READ :  मिस वर्ल्ड बनण्याअगोदर प्रियांका चोप्रा करायची ‘ही’ नोकरी!प्रियांका लवकरच तिच्या फॅन्सना सिल्वर स्क्रिनवर दिसणार आहे. हॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची भुरळ पाडल्यानंतर ती पुन्हा एकदा बॉलिवूडकडे वळली आहे. सलमान खानच्या 'भारत' या चित्रपटात ती दिसणार आहे. 'भारत'साठी प्रियांकाने मानधनापोटी भली मोठी रक्कम घेतल्याचे कळतेय. तूर्तास प्रियांका या चित्रपटात कुठली भूमिका साकारणार, हे गुलदस्त्यात आहे.सलमान आणि प्रियांकाची जोडी 2004 मध्ये रिलीज झालेल्या ‘मुझसे शादी करोगी’ या चित्रपटात एकत्र दिसले होते. रसिकांना दोघांची केमिस्ट्री आवडली देखील होती. त्यामुळे सलमान आणि प्रियांकाचे फॅन्स या चित्रपटाची नक्कीच आतुरतेने वाट पाहत असतील.  टी-सीरिज या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. 2019च्या ईदला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  भारतमध्ये सलमान खान 5 वेगवेगळ्या लूकमध्ये दिसणार आहे. चित्रपटात सलमान 60 वर्षांचे आयुष्य जगताना दाखवण्यात येणार आहे. 52 वर्षांचा सलमान खान ‘भारत’मध्ये 18 वर्षांचा दिसणार आहे