Join us

अन् ऐनवेळी प्रियंका चोप्राच्या ड्रेसने दिला दगा...! कान्स सोहळ्यात अशी झाली होती अवस्था!!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2021 1:02 PM

प्रियंकाने शेअर एक सीक्रेट किस्सा...

ठळक मुद्देमिस वर्ल्ड या स्पर्धेतही प्रियंकावर अशीच परिस्थिती ओढवली होती.

रेड कार्पेटवर प्रियंका चोप्रा किती आत्मविश्वासाने वावरते, हे तुम्ही जाणताच. तिचा रेड कार्पेट वॉक आणि तिचे आऊटफिट कायम चर्चेत असतात. पण यादरम्यान फजिती ओढवली तर? असाच एक सीक्रेट किस्सा प्रियंकाने शेअर केला आहे. तर हा किस्सा आहे गेल्या वर्षीच्या कान्स फिल्म्स फेस्टिवलदरम्यानचा.येत्या महिन्यात प्रियंकाचे ‘अनफिनिश्ड’ हे आत्मचरित्र प्रकाशित होतेय. याच पुस्तकातील एक कान्सदरम्यानचा किस्सा पीसीने तिच्या इन्स्टा अकाऊंऊटवर शेअर केला आहे.

‘मी बाहेरून अगदी शांत दिसत होते. पण आतून किती घाबरले होते, हे मलाच ठाऊक़..,’ असे लिहित तिने हा किस्सा सांगितला. आता असे झाले तरी काय होते, तर प्रियंका ऊप्स मोमेंटची शिकार होता होता बचावली होती. होय, कान्सच्या रेड कार्पेटवर प्रियंका उतरणार, तोच तिच्या ड्रेसचे झिपर तुटले होते. प्रियंकाने तो विंटेज ड्रेस परिधान केला. तो बंद करणार, इतक्यात या ड्रेसचा झिपर तुटला. सगळेच टेन्शनमध्ये आलेत. प्रियंकाचे टेन्शन तर विचारू नका. आता यावर उपाय काय तर प्रियंकाच्या टीमने अगदी वाटेत पाच मिनिटात या ड्रेसला शिवण घातली आणि वेळ निभावली.

कान्स सारख्या जगभर प्रसिद्ध असलेल्या सोहळ्यात अशी फजिती ओढवणे निश्चितच धडकी भरवणारे होते. पण प्रियंका व तिच्या टीमने संयमाने स्थिती हाताळली आणि कान्समध्ये प्रियंका तितक्यात आत्मविश्वासाने रेड कार्पेटवर उतरली.

असाच एक किस्सा...

मिस वर्ल्ड या स्पर्धेतही प्रियंकावर अशीच परिस्थिती ओढवली होती. प्रियंकाने स्वत: एका मुलाखतीत हा किस्सा सांगितला होता. या स्पर्धेत प्रियंकाने व्हाईट गाऊन परिधान केला होता आणि याला टेपने चिपकवण्यात आले होते. वारंवार हात हलवल्यामुळे हा टेप निघाला आणि प्रियंका टेन्शनमध्ये आली. पण यानंतर नमस्तेचा पोज बनवून प्रियंकाने पूर्णवेळ हा गाऊन होल्ड केला आणि वेळ निभवून नेली होती.

  

टॅग्स :प्रियंका चोप्रा