Join us

ठरले, प्रियंका चोप्रा-फरहान अख्तरचा 'स्काय इज पिंक' या तारखेला होणार रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2019 12:49 IST

अभिनेत्री प्रियंका चोप्रा सध्या तिचा आगामी सिनेमा 'स्काय इज पिंक'मुळे चर्चेत आहे. प्रियंकासोबत या सिनेमात फरहान अख्तर आणि  जायरा वसीम मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

ठळक मुद्देस्काय इज पिंक' सिनेमा 11 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे.

अभिनेत्री प्रियंका चोप्रा सध्या तिचा आगामी सिनेमा 'स्काय इज पिंक'मुळे चर्चेत आहे. प्रियंकासोबत या सिनेमात फरहान अख्तर आणि  जायरा वसीम मुख्य भूमिकेत दिसणार आहे. आता या सिनेमाची रिलीज डेट समोर आली आहे. 'स्काय इज पिंक' सिनेमा 11 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे.

प्रियंका चोप्राच्या या सिनेमाचे दिग्दर्शन सोनाली बोस करणार आहे. प्रियंका आणि सोनाली पहिल्यांदा एकत्र काम करतायेत. द स्काय इज पिंक हा सिनेमा आयशा चौधरी यांच्या जीवनावर आधारित. या सिनेमातून प्रियंका तीन वर्षानंतर बॉलिवूडमध्ये कमबॅक करतेय. यानंतर ती  भन्साळींसारख्या ‘लार्जर दॅन लाईफ’ दिग्दर्शकाच्या चित्रपटात काम करणार आहे. साहजिकच, आत्तापर्यंत अशी भूमिका साकारली नसल्यामुळे ‘लेडी डॉन’च्या भूमिकेत प्रियांकाला पाहणे इंटरेस्टिंग असणार आहे या यापूर्वी ‘सात खून माफ’ या चित्रपटात प्रियांकाने नकारात्मक भूमिका साकारली होती.  

लवकरच ती  ‘इजन्ट इट रोमॅन्टिक’ या हॉलिवूडपटात प्रियंका चोप्रा दिसणार आहे. यात ती  एका योगा अ‍ॅम्बिसीडरच्या भूमिकेत आहे. या चित्रपटात रिबेल विल्सन, लायन हेम्सवर्थ आणि एडम डिवाईनही महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. प्रियंकाची ‘क्वांटिको’ हीअमेरिकन सीरिज प्रचंड गाजली होती. या शोने प्रियंकाला हॉलिवूडमध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख दिली.

टॅग्स :प्रियंका चोप्राफरहान अख्तर