ठळक मुद्देहनीमूनवरून परतल्यानंतर प्रियांका आपला आगामी सिनेमा 'द स्काय इज पिंक’चे शूटिंग पूर्ण करणार आहे. त्यानंतर ती लगेच संजय लीला भन्साळींच्या सिनेमात दिसणार आहे. भन्साळींच्या सिनेमात प्रियांका ‘लेडी डॉन’ बनणार असल्याचे कळते.
प्रियांका चोप्रा आणि निक जोनासने जोधपूरच्या उमेद भवनात ख्रिश्चन आणि हिंदू पद्धतीने विवाह केला. सध्या प्रियांका आणि निक स्वित्झर्लंडमध्ये हनीमून एन्जॉय करतायेत.
एक मॅगझिनला दिलेल्या मुलाखती दरम्यान प्रियांका चोप्राला प्रश्न विचारण्यात आला, तू आणि निक एकमेकांना बिझी शेड्यूलमधून वेळ कसा देत आहात ?, यावर प्रियांका म्हणाली चांगला प्रश्न आहे. आमच्याकडे वेळ नाहीय. पण तुम्हाला वेळ काढावा लागतो. मला वाटते ती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते. आम्ही दोघे मेहनती आहोत, दोघांना ही प्रचंड काम करायला आवडते पण हे सगळं करताना आम्ही एकमेकांची प्रायोरिटी आहोत हे लक्षात ठेवले पाहिजे.
प्रियांकाने सांगितले मी आणि निकने जास्तीत जास्त वेळ एकमेकांना देण्याचे ठरवले आहे. तुम्ही पहिलेच असेल की आम्ही कामानिमित्त जगभरात फिरत असतो पण आम्हाला एक दिवस मिळाला तरी आम्ही तो एकमेकांसोबत घालवतो. कामाच्या वेळी काम आणि जो वेळ आमचा आहे तो आमचा आणि आम्ही ह्यात एकमेकांना समजून घेतो.
हनीमूनवरून परतल्यानंतर प्रियांका आपला आगामी सिनेमा 'द स्काय इज पिंक’चे शूटिंग पूर्ण करणार आहे. त्यानंतर ती लगेच संजय लीला भन्साळींच्या सिनेमात दिसणार आहे. भन्साळींच्या सिनेमात प्रियांका ‘लेडी डॉन’ बनणार असल्याचे कळते.प्रियांकाचा हा चित्रपट मुंबईतील कामाठीपुरातील मॅडम गंगुबाईच्या ख-या आयुष्यावर आधारित असल्याचे बोलले जात आहे. हुसैन जैदी यांनी लिहिलेल्या ‘माफिया क्विन आॅफ बॉम्बे’ या पुस्तकात गंगूबाईची माहिती दिली आहे. चित्रपटाचे कथानक यावर आधारित असेल. आत्तापर्यंत अशी भूमिका साकारली नसल्यामुळे ‘लेडी डॉन’च्या भूमिकेत प्रियांकाला पाहणे इंटरेस्टिंग असणार आहे या यापूर्वी ‘सात खून माफ’ या सिनेमात प्रियांकाने नकारात्मक भूमिका साकारली होती.