कोरोना व्हायरसच्या विरोधात चाललेल्या लढाईसाठी प्रियंका चोप्रा केलेल्या मदतीमुळे सध्या ती चर्चेत आहे. प्रियंकाने पीएम केअर फंडसह अनेक संस्थेसह बॉन विव नावाच्या संस्थेला 76 लाखांची मदत केली आहे.
शेवटची प्रियंका द स्काय इज पिंक सिनेमात दिसली होती. या सिनेमातील एक सीन शूट करताना प्रियंकाला तिचे अश्रू अनावर झाले होते. सीन शूट करताना प्रियंका अचानक ढसा-ढसा रडू लागली होती. ऐवढेच नाही तर सीन शूट झाल्यानंतरही बराच वेळ ती रडत बसली होती.
सिनेमाची दिग्दर्शक सोनाली बोस यांनी एका मुलाखती दरम्यान सांगितले होते की, ''द स्काय इज पिंकच्या एका सीनचे शूटिंग करताना प्रियंका खूप इमोशनल झाली. ती ढसाढसा रडू लागली. सीन शूट झाल्यानंतरही प्रियंकाचे अश्रू थांबायचे नाव घेत नव्हते. प्रियंका म्हणत होती मला माफ करा.. मला माफ करा. आता मला कळले एक आईला आपल्या मुलाला गमावण्याचे काय दु:ख असते. मला इशानला घेऊन खूप दु:ख होतेय आणि मी प्रियंकाला संभाळण्याचा प्रयत्न करत होते.''इशान हा दिग्दर्शिका सोनाली बोस यांचा मुलगा होता. इशानचा वयाच्या 16 व्या वर्षी करंट लागून मृत्यू झाला. सोनाली बोस यांचा हा सिनेमा एका सत्यकथेवर आधारित आहे.
देसी गर्ल प्रियंका चोप्रा लग्न झाल्यानंतर आपल्या संसारात आनंदी आहे. अमेरिकन सिंगर निक जोनास आणि प्रियंका दोघेही वैवाहिक आयुष्य एन्जॉय करत आहेत. लॉस एंजलिसमधील सॅन फनांडो व्हॅलीमध्ये प्रियंका व निकचा टुमदार बंगला आहे. या घराची किंमत साधारण १४४कोटी रुपये इतकी असल्याचे कळते.