अभिनेत्री प्रियांका चोप्राने बॉलिवूडमध्येचं नाही तर हॉलिवूडमध्येही स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सर्वाधिक फिट अभिनेत्रींमध्ये ती गणल्या जाते. पण कदाचित तुम्हाला माहित नसेल की, प्रियांकाला बालपणापासूनच अस्थमा आहे. अलीकडे एका व्हिडिओद्वारे प्रियांका या आजाराबद्दल जनजागृती करताना दिसली. इनहेलरचे फायदेही तिने सांगितले. अस्थमा या आजाराबद्दल लोकांना सांगण्यास मला काहीही हरकत नाही. यात लपवण्यासारखे काहीही नाही, असे प्रियांकाने हा व्हिडिओ शेअर करताना लिहिले आहे. मला वयाच्या पाचव्या वर्षांपासून अस्थमा आहे. माझ्या आईने मला यासाठी गोळ्या घेण्याऐवजी इनहेलर वापरण्याचा सल्ला दिला. सर्वांना वाटले की, इतक्या लहान वयात इनहेलर म्हणजे, मला याची सवय होईल. पण असे काहीही झाले नाही. अस्थमा मला माझी स्वप्न पूर्ण करण्यापासून रोखू शकला नाही. मी माझे आयुष्य अगदी मुक्तपणे जगले, जगतेय, असे प्रियांकाने या व्हिडिओत म्हटले आहे.
प्रियांका चोप्राला वयाच्या पाचव्या वर्षांपासून आहे ‘हा’ आजार!!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2018 11:57 AM