प्रियांका चोप्राला मागे टाकत दीपिका पादुकोण बनली ‘Most Followed Person’
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2018 9:34 AM
अभिनेत्री दीपिका पादुकोणने पुन्हा एकदा प्रियांका चोप्राला मात दिली आहे. होय, लोकप्रीयतेच्या बाबतीत दीपिका प्रियांकापेक्षा कितीतरी पुढे निघून गेलीय. ...
अभिनेत्री दीपिका पादुकोणने पुन्हा एकदा प्रियांका चोप्राला मात दिली आहे. होय, लोकप्रीयतेच्या बाबतीत दीपिका प्रियांकापेक्षा कितीतरी पुढे निघून गेलीय. भारतात पहिल्यांदा जाहीर झालेल्या इन्स्टाग्राम अवार्डमध्ये दीपिकाने ‘मोस्ट फॉलोड अकाऊंट’चा किताब जिंकला आहे. इन्स्टाग्रामवर दीपिकाचे 2 कोटी 24 लाख फॉलोअर्स तर इंटरनॅशनल स्टार प्रियांका चोप्राचे 2 कोटी 20 लाख फॉलोअर्स आहेत. फॉलोअर्सच्या या स्पर्धेत आलिया भट्ट तिस-या क्रमांकावर आहे. मार्च 2018 पर्यंत तिचे 2 कोटी 08 लाख फॉलोअर्स आहेत.‘मोस्ट एंगेज्ड अकाऊंट’चा अवार्ड क्रिकेटपटू विराट कोहलीने जिंकला आहे. आपल्या फलंदाजीने कोट्यवधी क्रिकेटप्रेमींची मने जिंकणाºया कोहलीचे इन्स्टाग्रामवर 1 कोटी 98 लाख फॉलोअर्स आहेत. गत वर्षभरात कोहलीच्या अकाऊंटवर सर्वाधिक लोक दिसले. ईशान खट्टरने ‘इमर्जिंग अकाऊंट’चा पुरस्कार जिंकला आहे. आलिया व श्रद्धा कपूरचा या पुरस्कारात ‘स्पेशल’ असा उल्लेख करण्यात आला आहे.ALSO READ : Video : ‘पद्मावत’चे पडद्यावर न दिसलेले ‘नैनो वाले ने’ हे गाणे आत्ता कुठे झाले रिलीज!‘पद्मावत’च्या रिलीजदरम्यान दीपिकाची लोकप्रीयता कमालीची वाढली. या चित्रपटावरून झालेल्या वादात दीपिकाची बरीच चर्चा झााली. कधी तिला जीवे मारण्याची धमकी मिळाली तर कधी नाक कापण्याची. यामुळे दीपिका कायम चर्चेत राहिली. तिला मिळालेला ‘मोस्ट फॉलोड अकाऊंट’चा पुरस्कार याचीच परिणीती आहे. माझ्या चाहत्यांसोबत मी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून जोडली गेली आहे. चाहत्यांच्या प्रेमामुळेच ‘मोस्ट फॉलोड अकाऊंट’ पुरस्कार मला मिळाला आहे. इन्स्टा अकाऊंटवर चाहत्यांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल मी सर्वांची आभारी आहे, अशी प्रतिक्रिया दीपिकाने दिली आहे. दीपिकाच्या तुलनेत प्रियांकाच्या इन्स्टा फॉलोअर्सची संख्या घटली आहे. हॉलिवूड प्रोजेक्टच्या निमित्ताने उण्यापु-या दोन वर्षांपासून प्रियांका देशाबाहेर आहे. ग्लोबल प्लॅटफॉर्मवर प्रियांका डंका वाजतोय. पण या काळात तिच्या भारतीय चाहत्यांपासून मात्र ती दूर गेलीय.