Join us

लग्नानंतर लगेच कामावर परतणार प्रियांका चोप्रा! भन्साळींसाठी बनणार ‘लेडी डॉन’!! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2018 12:06 IST

निक जोनाससोबत लग्न केल्यानंतर प्रियांकाचे आयुष्य किती बदलते, ती अमेरिकेत स्थायिक होते की बॉलिवूडशी जुळलेली नाळ कायम ठेवत, भारत आणि अमेरिका दोन्ही ठिकाणी राहणे पसंत करते, या प्रश्नांची उत्तरे आपल्या येत्या काळात मिळतीलच. तूर्तास एक ताजी बातमी म्हणजे, लग्नानंतर प्रियांका लगेच संजय लीला भन्साळींच्या चित्रपटात दिसणार आहे.

ठळक मुद्देगत १ डिसेंबरला प्रियांकाने ख्रिश्चन पद्धतीने लग्न केले. यानंतर काल २ डिसेंबरला तिने हिंदू पद्धतीने निकसोबत लग्नगाठ बांधली. लग्नापूर्वी प्रियांकाने बॉलिवूडचा ‘द स्काय इज पिंक’ हा चित्रपट हातावेगळा केला. या चित्रपटात प्रियांका फरहान अख्तरसोबत दिसणार आहे.

बॉलिवूड ते हॉलिवूड असा प्रवास करणारी  प्रियांका चोप्रा ही नुकतीच अमेरिकन सिंगर निक जोनाससोबत लग्नबेडीत अडकली. आता तर प्रियांका अधिकृतपणे अमेरिकेची सून बनली आहे. निक जोनाससोबत लग्न केल्यानंतर प्रियांकाचे आयुष्य किती बदलते, ती अमेरिकेत स्थायिक होते की बॉलिवूडशी जुळलेली नाळ कायम ठेवत, भारत आणि अमेरिका दोन्ही ठिकाणी राहणे पसंत करते, या प्रश्नांची उत्तरे आपल्या येत्या काळात मिळतीलच. तूर्तास एक ताजी बातमी म्हणजे, लग्नानंतर प्रियांका लगेच संजय लीला भन्साळींच्या चित्रपटात दिसणार आहे. होय, भन्साळींच्या चित्रपटात प्रियांका ‘लेडी डॉन’ बनणार असल्याचे कळते. प्रियांकाचा हा चित्रपट मुंबईतील कामाठीपुरातील मॅडम गंगुबाईच्या ख-या आयुष्यावर आधारित असल्याचे बोलले जात आहे. हुसैन जैदी यांनी लिहिलेल्या ‘माफिया क्विन आॅफ बॉम्बे’ या पुस्तकात गंगूबाईची माहिती दिली आहे. चित्रपटाचे कथानक यावर आधारित असेल. खरे तर  सुमारे वर्षभरापूर्वी या चित्रपटाबद्दलची बातमी आली होती. भन्साळी आणि प्रियांका या चित्रपटासाठी एकत्र येणार, अशी बातमी होती. त्यानंतर प्रियांकाने हा चित्रपट सोडल्याचीही बातमी आली होती.  

गत १ डिसेंबरला प्रियांकाने ख्रिश्चन पद्धतीने लग्न केले. यानंतर काल २ डिसेंबरला तिने हिंदू पद्धतीने निकसोबत लग्नगाठ बांधली. लग्नापूर्वी प्रियांकाने बॉलिवूडचा ‘द स्काय इज पिंक’ हा चित्रपट हातावेगळा केला. या चित्रपटात प्रियांका फरहान अख्तरसोबत दिसणार आहे. लग्नानंतर प्रियांका पुन्हा एकदा अभिनयाकडे वळणार आहे आणि भन्साळींसारख्या ‘लार्जर दॅन लाईफ’ दिग्दर्शकाच्या चित्रपटात काम करणार आहे. साहजिकच, आत्तापर्यंत अशी भूमिका साकारली नसल्यामुळे ‘लेडी डॉन’च्या भूमिकेत प्रियांकाला पाहणे इंटरेस्टिंग असणार आहे या   यापूर्वी ‘सात खून माफ’ या चित्रपटात प्रियांकाने नकारात्मक भूमिका साकारली होती.  

 

टॅग्स :प्रियंका चोप्राप्रियांका चोप्रा आणि निक जोनासनिक जोनास