Join us  

Priyanka Chopra : 'देसी गर्ल' लेक मालती मेरीसह मुंबईत परतली, बहीण परिणीतीच्या लग्नाचंच तर कारण नाही ना?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2023 4:31 PM

अभिनेत्री प्रियंका चोप्रा पती निक जोनास आणि लेक मालती मेरी सह भारतात पोहोचली आहे

अभिनेत्री प्रियंका चोप्रा पती निक जोनास (Nick Jonas) आणि लेक मालती मेरी सह (Malti mary) भारतात पोहोचली आहे. सध्या प्रियंकाची चुलत बहीण अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि आम आदमी पार्टीचा नेता राघव चड्डा (Raghav Chadha) लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान आता प्रियांका चोप्राही मुंबईत परत आली असून तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये प्रियांका खूपच सुंदर दिसत होती तर तिचा पती निक जोनासने निळ्या रंगाच्या जॅकेटमध्ये दिसला. केशरी रंगाची कॅप त्याने घातली होती. तर यावेळी प्रियांकाच्या क्युट लेकीने सर्वांचंच लक्ष वेधलं. लेकीच्या जन्मानंतर प्रियांका पहिल्यांदाच तिला भारतात घेऊन आली आहे. दरम्यान प्रियांकाचं भारतात येण्याचं कारण परिणीतच तर नाही ना असा संशय नेटकऱ्यांनी बोलून दाखवला आहे.

प्रियांका कुटुंबासह मुंबईत आली हे बघताच नेटकऱ्यांनी कमेंट्स सेक्शनमध्ये परिणीतीच्या लग्नाचीच चर्चा सुरु केली. 'वाह! परिणीतीच्या लग्नासाठी आली आहे का' अशाच कमेंट्स युझर्सने केल्या आहेत. 

"नाहीतर तिचेही हाल परवीन बाबी, सुशांतसिंगसारखे झाले असते", प्रियांका चोप्राला सेलिब्रिटींचा पाठिंबा

प्रियांका चोप्राचा मुख्य भूमिका असलेला पहिला हॉलिवूड चित्रपट नुकताच रिलीज झाला आहे. 'सिटाडेल' (Citadel) या हॉलिवूडपटात तिने मुख्य अभिनेत्री असून ती डिटेक्टिव्हच्या भूमिकेत आहे. त्यामुळे प्रियांका भारतातही सिनेमाचं प्रमोशन करण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :प्रियंका चोप्रापरिणीती चोप्रालग्नमुंबई