Join us

Priyanka Chopra : पतीला दुसऱ्या महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यास काय करशील? प्रियंका चोप्रानं दिलं होतं हे उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2022 4:10 PM

Priyanka Chopra : 2008 मध्ये प्रियंकाने अमेरिकन सिंगर निक जोनाससोबत लग्नगाठ बांधली. निक व प्रियंका आनंदात नांदत आहेत. दोघांचंही एकमेकांवर प्रेम आहे. अर्थात एकदा प्रियंका विश्वासघातावर बोलली होती....

प्रियंका चोप्रा ( Priyanka Chopra ) आज ग्लोबल आयकॉन बनली आहे. बॉलिवूडसोबत हॉलिवूडमध्ये दबदबा निर्माण करणारी प्रियंका केवळ अभिनेत्री नाही तर एक यशस्वी बिझनेसवुमनही आहे. प्रियंकाची प्रोफेशनल लाईफ जितकी प्रेरणादायी आहे तितकीच पर्सनल लाईफही प्रेरणादायी आहे. 2008 मध्ये प्रियंकाने अमेरिकन सिंगर निक जोनाससोबत लग्नगाठ बांधली. आता ती एका मुलीची आई आहे. निक व प्रियंका यांच्यात वयात बराच फरक आहे. यावरून सुरूवातीला प्रियंकाला बरंच ट्रोलही केलं गेलं. पण निक व प्रियंका आनंदात नांदत आहेत. दोघांचंही एकमेकांवर प्रेम आहे. अर्थात एकदा प्रियंका विश्वासघातावर बोलली होती. पतीने   विश्वासघात केलाच तर? असा प्रश्न प्रियंकाला विचारण्यात आला होता. यावर प्रियंका स्पष्ट उत्तर दिलं होतं.  

2006 मध्ये प्रियंकाचा ‘बाजीराव मस्तानी’ हा सिनेमा केला होता. या पार्श्वभूमीवर तिने ‘फिल्मफेअर’ला मुलाखत दिली होती. अनेक नवरे आपल्या बायकांचा विश्वासघात करतात. पण बायका शांत बसतात, हे गैर असल्याचं ती म्हणाली होती. इतकंच नाही तर तिने स्वत:च उदाहरण दिलं होतं.ती म्हणाली होती, ‘माझा पती दुसऱ्या  महिलेच्या प्रेमात पडलाच तर मी त्याला टाटा- बायबाय करेल. माझ्या मते, जोपर्यंत प्रेम आहे, एकमेकांप्रती विश्वास आहे, तोपर्यंतच नात्यात राहण्यात अर्थ आहे. तुमच्या पार्टनरला दुसरी कुणी मिळाली तर त्याच्यासोबत राहण्यात अर्थ काय? छोट्या क्षुल्लक कारणासाठी घटस्फोट घेण्याबद्दल मी बोलत नाहीये. पण पती दुसऱ्या  बाईच्या प्रेमात पडला असेल तर त्या परिस्थितीबद्दल मी बोलतेय. पती तुम्हाला चीट करत असेल तर  तर आपला संसार वाचवण्यासाठी तुम्हाला लढायला हवं. पण जेव्हा त्याचं मनं तुमच्याऐवजी दुसरीत गुंतलं असेल तर अशा नात्याला वाचवून फायदा नाही. अशा नात्यात ना तो आनंदी राहणार, ना तुम्ही. जेव्हाही पतीचा चेहरा बघाल, त्याच्या चेहऱ्यावर ती दिसेल. अशास्थितीत त्याला बळजबरी करण्यात अर्थ नाही. शेवटी बाईचा आत्मविश्वास महत्त्वाचा आहे.’

पतीला दुसऱ्या  महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यावर काय करशील? असं विचारलं असता ती म्हणाली होती, ‘मी कदाचित त्याला वाईट पद्धतीने झोडपून काढेल. त्याला बंद करेल. माहित नाही मी आणखी काय काय करेल. मी अनेकदा हिंसक होते. मी त्याच्यावर किती प्रेम करते, या आधारावर कदाचित मी त्याला माफही करेल आणि कदाचित कधीच माफही करणार नाही. ’

टॅग्स :प्रियंका चोप्रानिक जोनास