देसी गर्ल प्रियंका चोप्रा तीन वर्षानंतर बॉलिवूडमध्ये कमबॅक करण्याससाठी सज्ज झाली आहे. प्रियंका शेवटची 2016 मध्ये आलेल्या 'जय गंगाजल' सिनेमात दिसली होती. लवकरच तिचा 'द स्काय इज पिंक' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'द स्काय इज पिंक' सिनेमाचा ट्रेलर आऊट झाला आहे. ट्रेलर फॅन्सच्या पसंतीस देखील उतरला आहे.
राजस्थान पत्रिकाच्या रिपोर्टनुसार एका मुलाखती दरम्यान प्रियंका म्हणाली की, अशा थाटणीचे सिनेमा करायला खूप वेळ लागतो म्हणून तिने गेल्या तीन वर्षांत कोणत्याच सिनेमात काम केले नाही. प्रियंका एका अशा सिनेमाच्या शोधात होती जिथे तिला एक अभिनेत्री म्हणून पूर्णपणे एकरुप होण्याची संधी मिळेल. मग तो सिनेमा भारतीय असो किंवा अमेरिकेत तयार होणारा असो.
‘स्काय इज पिंक’ हा सिनेमा एका सत्य घटनेवर आधारित आहे. प्रियंकाने यात एका टीनेजर मुलीच्या आईची भूमिका साकारली आहे. झायरा यात टीनेजर मुलीच्या भूमिकेत आहे. ट्रेलरमध्ये एक भावनिक कथा सूत्र पाहायला मिळते. एकीकडे प्रियंका आणि फरहान अख्तरची लव्हस्टोरी आणि दुसरीकडे त्यांच्या मुलीला झालेला दुर्मिळ आजार अशी ही कथा आहे.
मुलीच्या आजारापणाबद्दल प्रियंका व फरहानला समजते तेव्हा तिच्या उपचारासाठी दोघांचा संघर्ष सुरु होतो. यादरम्यान नवरा-बायकोच्या नात्यात आलेला दुरावा, वाद असे सगळे काही यात आहे. मुलगी हेच विश्व असलेल्या प्रियंकाने यात एका खंबीर आईची भूमिका साकारली आहे.
सोनाली बोस हिने हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. यात मोटिव्हेशन स्वीकर आयशा चौधरी आणि तिच्या पालकांची सत्य कथा दाखवण्यात आली आहे. येत्या ११ ऑक्टोबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.