ग्लोबल स्टार प्रियंका चोप्राच्या (Priyanka Chopra) आई आणि भावाने पुण्यात एक बंगला भाड्याने घेतला आहे. यासाठी ते दर महिन्याला लाखो रुपये मोजत आहे. को लिविंग आणि को वर्किंग कंपनीकडून त्यांनी हा बंगला रेंटवर घेतला आहे. प्रियंकाची आई मधु चोप्रा आणि भाऊ सिद्धार्थ चोप्रा यांनी कंपनीसोबत ही डील केली आहे.
प्रियंका चोप्राच्या या नवीन घरासाठीची कायदेशीर प्रक्रिया नुकतीच पार पडली. हिंदुस्तान टाईम्स रिपोर्टनुसार, मधु चोप्रा आणि सिद्धार्थ चोप्रा यांनी 21 मार्च रोजी प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन केले. पुण्यातील या बंगल्यासाठी 6 लाख रुपये सिक्युरीटी डिपॉझिटमध्ये जमा करण्यात आले आहेत. या बंगल्याचं दरमहा भाडं 2.06 लाख रुपये आहे. पुण्यातील कोरेगाव पार्क स्थित हा बंगला 3754 स्क्वेअर फुटमध्ये पसरला आहे. ग्राऊंड फ्लोकर 2180 स्क्वेअर फुट, बेसमेंट एरिया 950 स्क्वेअर फुट आणि गार्डन एरिया 2232 स्क्वेअर फुट आहे. तर पार्किंगसाठी 422 स्क्वेअर फुटची जागा आहे.
प्रियंका चोप्रा रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या सेलिब्रिटींच्या यादीत आहे. अभिनेत्रीचे मुंबईत दोन पेंटहाऊस होते जे तिने नंतर विकले. प्रत्येकी 6 कोटींना तिने हे पेंटहाऊस विकले. प्रियंकाने याआधी अंधेरीतील लोखंडवालामध्ये एक कमर्शियल प्रॉपर्टी घेतली होती जी 7 कोटींना विकली. एका डेंटिस्ट कपलला तिने ही विकली ज्यांनी 2021 साली भाड्याने घेतली होती. जून २०२१ साली प्रियंकाने अंधेरीतील ओशिवरामध्ये दुसऱ्या मजल्यावरील एक ऑफिस भाड्याने घेतलं होतं ज्याची जागा 2040 स्क्वेअर फुट होती. प्रियंकाने ही प्रॉपर्टी 2.11 लाख प्रति महा भाड्यावर घेतली होती.