Join us

'तो माझ्या आयुष्यातला सर्वात चुकीचा निर्णय होता' प्रियंका चोप्राच्या आईचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2023 15:19 IST

मधु चोप्रा यांना आता मात्र त्यांच्या या निर्णयाचा पश्चात्ताप होतोय.

ग्लोबल स्टार प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) पती निक जोनाससोबत अमेरिकेतच स्थायिक झाली आहे. तसंच दोघंही सध्या लेक मालती मेरीचा सांभाळ करत आहेत. प्रियंका लेकीला घेऊन निकच्या लाईव्ह कॉन्सर्ट्सलाही जाते तर कधी न्यूयॉर्कच्या रस्त्यांवर फिरतानाचे तिचे फोटो व्हिडिओ व्हायरल होत असतात. नुकतंच प्रियंकाची आई मधु चोप्रा (Madhu Chopra) यांनी प्रियंकाला लहानपणी बोर्डिंग स्कुलमध्ये पाठवण्याबाबतीत खुलासा केला आहे.

प्रियंकाच्या मातृत्वाबद्दल मधु चोप्रा यांना जेव्हा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्या म्हणाल्या,'ती एक सुपरवुमन आहे. प्रियंकाला मी बोर्डिंग स्कुलमध्ये पाठवायला नव्हतं पाहिजे. आजही मी तो विचार करते तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी येतं. मी स्वत:ला दोषी समजते. तिला बोर्डिंग स्कुलमध्ये पाठवणं ही माझी चूक आहे. हा माझ्या आयुष्यातील सर्वात चुकीचा निर्णय होता.'

त्या पुढे म्हणाल्या, 'प्रियंका कशालाच घाबरत नाही. ती निडर आहे. ती लेकीलाही तिच्यासारखंच बनण्याचं पूर्ण स्वातंत्र्य देत आहे. मुलीला कधीच नाही म्हणू नको तिची समजूत घाल मग ती नक्की ऐकेल असा मी प्रियंकाला सल्ला दिला. मी तर मालतीसोबत खूप खूश असते. तिला जवळ घेणं ही एक वेगळीच फिलींग आहे.'

प्रियंकाने याआधी मुलाखतींमध्ये तिच्या बोर्डिंग स्कुलमधील दिवसांची आठवण सांगितली होती. ते दिवस किती कठीण होते तिला तिथे रंगावरुन हिणवलं जायचं असा तिने खुलासा केला होता. तर तिची आई मधु चोप्रा यांना आता मात्र त्यांच्या या निर्णयाचा पश्चात्ताप होतोय.

टॅग्स :प्रियंका चोप्राबॉलिवूडपरिवारशाळा