बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा ३ वर्षांनंतर भारतात परत आली. यावेळी तिचे अनेक ब्रॅंड्स सोबत शूट होते. प्रियांका चोप्रा युनिसेफ ची ब्रॅंड अॅंबेसिडर आहे. यानिमित्त ती उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ मध्ये एका कार्यक्रमात सहभागी झाली होती. तिथे तिने पोलिसांसोबत चर्चा केली. दरम्यान प्रियांकाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यात तिने महिलांसोबत होणाऱ्या अत्याचाराविरोधात भाष्य केले आहे.
या व्हिडिओमध्ये ती एका महिलापोलिस अधिकाऱ्याला सांगताना दिसत आहे की, उत्तर प्रदेश मध्ये संध्याकाळी ७ नंतर महिलांना घराबाहेर जायची भिती वाटते. यामध्ये प्रियांका म्हणते, 'मी सुद्धा लखनऊ मध्ये शिकले आहे मला एक सांगा युपी सारख्या राज्यात इथे एक भीतीचे वातावरण असते. विशेषकरुन संध्याकाळी ७ नंतर.' यावर महिला पोलिस अधिकारी हसते आणि म्हणते मी तुम्हाला डेटा दाखवते.
पुढे प्रियांका वुमेन पॉवर लाईन सुविधेची चाचपणी करताना दिसत आहे. ही अशी सुविधा आहे जिथे महिला २४ तास कधीही आपली तक्रार देऊ शकतात. प्रियांकाने व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत लिहिले, 'महिलांच्या सुरक्षेबाबत चर्चा झाली पाहिजे. अजुनही देशाच्या कानाकोपऱ्यातुन महिलांवरील अत्याचाराच्या घटना समोर येतात. यासाठी अजून कायदा आणि पोलिसांच्या दृष्टाने खूप काम बाकी आहे.
यावर समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी ट्विट करत सरकारवर निशाणा साधला आहे. महिलांना असुरक्षित वाटणे हे शासनाचे अपयश आहे, असे ट्विट त्यांनी केले आहे.
लखनऊ शहरात दिलेल्या भेटीनंतर प्रियांका चोप्रा पुन्हा अमेरिकेत परतली. लखनऊ मध्ये तिने मुलींशी निगडित अनेक संस्थांना भेटी दिल्या आणि चर्चा केली.